पिंपळगाव (नजिक) सोसायटीच्या चेअरमनपदी भाऊसाहेब घोडे बिनविरोध

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपळगाव (नजिक ) वि. का. सोसायटी चेअरमनपदी भाऊसाहेब बबन घोडे बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार (दि. 0९) रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड यांचे कार्यालयात सहकार अधिकारी ढवळे यांचे अध्यक्षतेखाली नुतन चेअरमन निवडीची प्रक्रिया पार पडली असता चेअरमन पदासाठी भाऊसाहेब घोडे यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

येथील पिंपळगाव (नजिक) वि. का. सोसायटी चेअरमनपद बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखण्यात आली. यापुर्वीचे चेअरमन प्रशांत बागल यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने सदर निवड करणेत आली. या निवड प्रक्रियेसाठी संस्थेचे सचिव नरहरी गंभिरे, लिपिक रविंद्र बागल यांनी परीश्रम घेतले.

यावेळी सुभाष जाधव, प्रशांत बागल, सागर आढाव, भागीनाथ बागल, सदाशिव पवार, रतन घोडे, व्हा चेअरमन मीराबाई घोडे आदी संचालक उपाथित होते. नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब घोडे यांचा या प्रसंगी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक जयदत होळकर, जिल्हादूध संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी ढेपले, गुणवंत होळकर, चारुदत आढाव, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे यांनी सत्कार केला.

या प्रसंगी मधुकर भोर, हीरामण घोडे, मधुकर सरोदे, राजाराम घोडे, सलीम काजी, कैलास सोनवणे, दत्तु खाडे, राजु सुरसे, परशराम घोडे, लक्ष्मण घोडे, विजय भोर, भास्कर घोडे, सोमनाथ राऊत, विश्वास दरेकर, सचिन वाघ, योगेश चव्हाण, योगेश मोरे, सोमनाथ घोडे, सचिन घोडे, राजु व्हलगडे, विजय व्हलगडे, अंकुश व्हलगडे, दत्तु घडगे आदी उपस्थित होते.