Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | फळबाग लागवडीसाठी घ्या ‘या’ सरकारी योजनेचा लाभ; असा करा अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ न घेता येऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांना संधी मिळावी या हेतूने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये एकूण सोळा बहुवार्षिक पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार किंवा कृषी हवामान क्षेत्रास अनुकूल असलेल्या फळपिकांच्या कलमांची अथवा रोपांची कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या वाणांची लागवड करण्याची मुभा देण्यात आली आहे.

या योजनेच्या अंतर्गत किमान ०.८० हेक्टर ते ६ हेक्टर पर्यंतचे क्षेत्र मर्यादा असणे गरजेचे आहे. अशी माहिती सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी दिली आहे. (Bhausaheb Phundkar Orchard Plantation)

या योजनेच्या माध्यमातून खालील फळपिकांचा लाभ घेता येणार :
– आंबा कलमी हे फळपीक असेल तर दहा बाय दहा अंतर मीटरमध्ये 100 झाडांकरिता आणि त्यासाठी ६५ हजार ८४ रुपये इतके अनुदान मिळेल

– आंबा कलमी (सधन लागवड) पाच बाय पाच अंतरावर ४०० झाडांकरिता १ लाख २६ हजार १४४ रुपये अनुदान मिळेल.

– पेरू कलमी आणि सदन लागवड पेरू कलमे यांसाठी सहा बाय सहा आणि तीन बाय दोन या अंतर मीटरवर २७७
आणि १६६६ या झाडांच्या संख्या करिता अनुक्रमे ७३ हजार ३१९ व २ लाख २३ हजार ८११ रुपये इतके अनुक्रमे
अनुदान मिळेल.

– डाळिंब कलमी याकरिता चार बाय तीन अंतर मीटरसाठी ७४० झाडांकरिता १ लाख १७ हजार ६१५ रुपये इतके अनुदान मिळेल.

– कागदी लिंबू कलमी सहा बाय सहा अंतर मीटर असणाऱ्या २७७ झाडांकरिता ८१ हजार ३८३ रुपये अनुदान मिळेल.

– सिताफळ कलमी पाच बाय पाच मीटर अंतरावरील ४०० झाडांकरिता ८६ हजार ७६२ रुपये अनुदान मिळेल.

– नारळ रोपांकरिता आठ बाय आठ मीटर अंतरावर १५० झाडांकरिता ५२ हजार ३२ रुपये अनुदान मिळेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागणार आहेत.
वरील फळांव्यतिरिक्त मोसंबी, काजू , संत्रा, जांभूळ, चिंच, आवळा, चिकू इत्यादी फळपिकांकरिता सुद्धा
अनुदान देण्यात येणार आहे. शासनाद्वारे खड्डे खोदणे कलमे किंवा रोपांची लागवड करणे पिक संरक्षण व
ठिबक द्वारे पाणी देणे याकरिता सुद्धा अनुदान रक्कम देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकऱ्यानी महाडिबीटी
पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करायचे आहेत. तसेच याबद्दल अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक,
कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा.
असे आवाहन सोलापूरच्या तालुका कृषी अधिकारी मनीषा मिसाळ (Manisha Misal) यांनी केले आहे.

Web Title :- Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | bhausaheb phundkar orchard plantation scheme has been started in solapur district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CP Retesh Kumaarr | औद्योगिक कंपन्या व व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्या बेकायदेशीर संघटनांवर कडक कारवाई करणार, न घाबरता तक्रार करावी; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे आवाहन

Anil Bonde | ‘जयंत पाटलांना शरद पवार हे शकूनी मामा पेक्षाही ‘पॉवरफूल’ आहेत, असे तर म्हणायचे नाही ना’, अनिल बोंडेंचा घणाघात