Bhausaheb Rangari Ganpati | प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमांची केली घोषणा, यंदाही ऑनलाईन कार्यक्रम पाहता येणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Bhausaheb Rangari Ganpati |मागील वर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी पुण्यातील गणेशोत्सवावर (pune ganesh festival) कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे गणेश भक्तांना मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेता येणार नाही. भाविकांना श्रींचे दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा यासाठी भाऊसाहेब रंगारी गणपती (Bhausaheb Rangari Ganpati) मंडळाच्या वतीने खास आयोजन केले आहे. भाऊसाहेब रंगारी गणपती (Bhausaheb Rangari Ganpati) मंडळाचे उत्सव प्रमुख आणि प्रसिध्द उद्योगपती पुनीत बालन (Punit Balan) यांनी दहा दिवसांत होणाऱ्या सांस्कृती कार्यक्रमांची घोषणा केली आहे.

गणेश भक्तांना हे कार्यक्रम पाहता यावेत यासाठी मंडळाच्यावतीने www.bhaurangari.com या वेबसाईटवर थेट प्रेक्षेपण दाखवले जाणार असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली. मागील वर्षीही अशाच प्रकारे भक्तांना ऑनलाईन कार्यक्रम (Online event) दाखवण्यात आले होते. गायक जावेद अली यांच्यासह अनेक मोठे कलाकार त्यांचा परफॉर्मन्स ऑनलाइन सादर करणार आहेत.

 

 

गणेशोत्सव काळात होणारे कार्यक्रम आणि वेळ खालील प्रमाणे

परंपरा कीर्तनाची, भक्तीची, प्रबोधनाची!

गणेशोत्सव आणि कीर्तनाची परंपरा पूर्वीपासूनची… ही परंपरा पुढे नेत गणेशोत्सव आणि स्वातंत्र्यलढा हा विषय उलगडणारं, प्रबोधन करणाऱ्या कीर्तनाचा घरबसल्या आनंद घ्या.

सहभाग – ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे (Charudatta Aphale)
दिनांक – 10 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

मैफल शब्दांची, कवितांची, कवींची!

प्रत्येक कवीच्या काही कविता रसिकांनी ऐकलेल्या असतात, तर काही कविता कवीला ऐकवावाश्या वाटतात. म्हणूनच दोन कवींची, त्यांच्या कवितांची अप्रतिम शब्दमैफल!

सहभाग : संदीप खरे (Sandeep Khare), वैभव जोशी
निवेदन : मिलिंद कुलकर्णी
दिनांक – 11 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

 

वंदन श्री गणेशाला, अभिवादन स्वरभास्कराला!

भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. या औचित्यानं या स्वरभास्कराला अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या संगीत घराण्यांच्या मान्यवर गायकांची बहारदार स्वरमैफल! दोन भागांच्या मैफलीतल्या पहिला भागाचा आज आनंद घ्या.

सहभाग : जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे
निवेदन : मिलिंद कुलकर्णी, स्वानंदी टिकेकर
दिनांक – 12 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

 

स्मरण स्वरभास्कराचे!

जन्मशताब्दी वर्षानिमित्त औचित्यानं भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन! मान्यवर गायकांचा सहभागानं सजलेल्या स्वरमैफलीचा आज अनुभवा भाग दुसरा…

सहभाग : शौनक अभिषेकी (Shaunak Abhishek), रघुनंदन पणशीकर
निवेदन : मिलिंद कुलकर्णी, स्वानंदी टिकेकर
दिनांक – 13 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

 

वैविध्य मराठी मातीचे, रंग महाराष्ट्राचे!

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्ठी निमित्त महाराष्ट्राच्या सांगीतिक परंपरेचा वेध… रंग महाराष्ट्राचे! भूपाळीपासून पोवाड्यापर्यंत आणि गणगवळण पासून भारुडापर्यंत वैविध्यपूर्ण गाण्यांची पर्वणी!

सहभाग : चैतन्य कुलकर्णी, जितेंद्र अभ्यंकर, अंजली मराठे आणि सहकारी
निवेदन : स्वानंदी टिकेकर
दिनांक – 14 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

मंजुळ स्वरांची, मैफल बासरीवादनाची!

ज्येष्ठ बासरीवादक पद्मभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सांगीतिक योगदानाला सलाम करण्यासाठी ‘हरि-प्रसाद’ बासरी वादकांची अनोखी मैफल.. बासरीच्या मंजुळ स्वरांची, मान्यवर कलाकारांच्या वादनाची पर्वणी अनुभवा.

सहभाग – राकेश चौरासिया, अमर ओक, वरद कठापूरकर, निलेश देशपांडे आणि सहकारी
निवेदक – मिलिंद कुलकर्णी
दिनांक – 14 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

 

कार्यकर्ता ते नेता!

गणेशोत्सवात कार्यकर्ता म्हणून घडलेल्या आणि आता विविध राजकीय पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या नेत्यांशी संवाद… कार्यकर्ता ते नेता ही त्यांची वाटचाल उलगडतानाच महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने रंगारी कट्ट्यावर खुमासदार गप्पांची मेजवानी…

सहभाग – महापौर मुरलीधर मोहोळ, अरविंद शिंदे (गटनेता) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, प्रशांत जगताप (अध्यक्ष) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, पुणे, संजय मोरे – (शहरप्रमुख) शिवसेना, वसंत मोरे-(अध्यक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पुणे, मंदार जोशी – (राष्ट्रीय निमंत्रक) आर.पी.आय. (A) यांच्या सोबत विनोद सातव यांच्या दिलखुलास गप्पा
निवेदक – विनोद सातव
दिनांक – 16 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

आनंद तालासुराचा, शास्त्रीय संगीताचा, चित्रपट संगीताचा

चित्रपट संगीत लोकप्रिय असलं, तरी त्याचा पाया एका अर्थाने शास्त्रीय संगीतच असतो. हे नातं उलगडणारी बहारदार संगीत मैफल बियाँड बॉलिवूड…

सहभाग – पं. विजय घाटे आणि सहकारी
निवेदक – मिलिंद कुलकर्णी
दिनांक – 17 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

मैफल नवी, सूर नवे

लोकप्रिय गाण्यांची नव्या दमाच्या गायकांनी केलेली नवी मांडणी. नव्या सुरांची नवी पर्वणी –
मेहफिल Unlocked
सहभाग – हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर
निवेदन – पूर्वी भावे
दिनांक – 18 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

 

दमदार संगीताची पर्वणी, लोकप्रिय गाण्यांची मेजवानी!

कुन फाया कुन ते सूर निरागस हो अशी हिंदी मराठी चित्रपटांतील लोकप्रिय गाण्यांची मेजवानी मिळणार आहे जावेद अली लाइव्ह या कार्यक्रमात… अनुभवा गणेशोत्सवातील सांस्कृतिक महोत्सवाच्या अविस्मरणीय समारोप!

सहभाग – जावेद अली आणि सहकारी
दिनांक – 19 सप्टेंबर
स्थळ : www.bhaurangari.com

 

Web Title : Bhausaheb Rangari Ganpati | punit balan announces cultural program of shrimant rangari ganpati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Rape Case | बलात्कार करुन तरुणीच्या गुप्तांगात टाकला रॉड, मुंबईतील संतापजनक घटना

Pune Police | पुणे पोलिसांनी तत्परता ! वाट चुकलेल्या 6 वर्षीय ‘अक्सा’ला केलं आईच्या स्वाधीनं

Devendra Fadnavis | पोलिस निरीक्षकाची पत्रकारांवर आरेरावी, फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा (व्हिडिओ)