कौतुकास्पद ! भावना कांत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार्‍या पहिल्या महिला फायटर पायलट ठरणार

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गतवर्षी भावना कांत हिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारी शक्ती पुरस्काराने सन्मानीत केले होते. भावना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परेडमध्ये सहभागी होणारी पहिली महिला पायलट ठरणार आहे. भारतीय वायुसनेच्या फायटर पायलट दलात सहभागी होणारी ही तिसरी महिला आहे. भावना भारतीय वायूसेनेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परेडचा एक भाग असणार आहे. ज्याची थिम ‘मेक इन इंडिया’ आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती राफेल आणि सुखोई याशिवाय इतर लडाऊ विमान उडवणं पसंत करेल. भारतीय वायूसेना या दरम्यान एलसीए तेजस, लाइट कॉमबॅट हेलिकॉप्टर, रोहिणी रडार, आकाश मिसाइल आणि सुखोई ३० एमकेआयचे प्रदर्शन करणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ही संधी मिळणार असल्याचा आनंद भावनाला आहे. यावेळी, भावनाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ”दरवर्षी मी प्रजासत्ताक दिनाची परेड टिव्हीवर पाहते. आता मी स्वतः या परेडचा एक भाग बनणार आहे. ही माझ्यासाठी गर्वाची बाब आहे. ”

भावना घनश्यामपुरच्या प्रखंडच्या बाऊर या गावातील रहिवासी आहे. तिचे वडिल इंजिनीअर असून रिफायनरी टाऊनशिपमध्ये सेवा पुरवतात. भावनाने आपले संपूर्ण शिक्षण बरौनी रिफाइनरी डीएवी पब्लिक स्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर बंगलुरूच्या बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजीनियरिंगची पदवी मिळवली. फ्लायपास्टमध्ये समावेश असलेल्या ४२ विमानांपैकी १५ लढाऊ विमाने, ५ वाहतूक विमाने, १७ हेलिकॉप्टर्स, १ व्हिंटेज आणि ४ सैन्य हेलिकॉप्टर्स असतील. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात हवाई दलाच्या पथकात ४ अधिकारी आणि ९६ हवाई योद्ध्यांचाही समावेश असणार आहे.