… म्हणून डॉ. आयुषी शर्मा कोर्टात भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात जबाब न नोंदवता पडल्या बाहेर

इंदूर : वृत्तसंस्था – आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची सुनावणी इंदूर येथील कोर्टात सुरु आहे. मात्र सुनावणी दरम्यान डॉ.आयुषी शर्मा सोमवारी (दि. 1) जबाब न देताच निघून गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. 5 ) होणार आहे.

डॉ. आयुषी शर्मा सोमवारी आपला जबाब नोंदवण्यासाठी कोर्टात पोहोचल्या होत्या. परंतु, त्याच दरम्यान त्यांच्या नातेवाईकाने त्यांना फोन करून माहिती दिली की, ग्वालियर येथे त्यांच्या आजोबांचे निधन झाले आहे. आयुषी यांनी ही माहिती न्यायाधिशांना सांगितली. त्यानंतर जबाब न नोंदवता त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. सोमवारपासून आयुषी यांची उलटतपासणी होणार होती. पण, पहिल्याच दिवशी त्यांचा जबाब नोंदवता आला नाही.

या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. 5 ) होणार आहे. यावेळी कैलास पाटील आणि दिनेश कुमार या दोघांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तर 9 फेब्रुवारीला राजेश डावर आणि अमोल चौहान यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 10 जानेवारीला प्रवीण दिनकर राव आणि शेखर मदनलाल शर्मा यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.