वर्षभरात ‘गूढ’ उलगडलं : ‘या’ कारणामुळे भय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या

इंदूर : वृत्तसंस्था – आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला आज वर्ष पूर्ण झाले आहे. भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ आता जवळपास उलगडलेले आहे. आपली बदनामी केली जाईल अशी भीती भय्यू महाराजांना होती, आपल्या प्रतिमेला तडा जावू नये म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.

लग्नासाठी दबाव –

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली ती एका पलक नावाच्या तरुणीमुळे. संबंधित युवतीने भय्यू महाराजांवर लग्नासाठी दबाव टाकला होता. लग्न न केल्यास दाती महाराजांप्रमाणे तुमच्यावर गुन्हा दाखल करु अशी धमकी तिने दिली होती, असं तपासात उघड झालं. भय्यू महाराज यांची पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर एक तरुणी आश्रमात आली होती. केअर टेकर म्हणून ती आश्रमात आली. महाराजांच्या एकटेपणाचा फायदा घेत तिने प्रेम संबंध निर्माण केले काही दिवसांनी ती भय्यू महाराज यांच्या खोलीतच राहू लागली. भय्यू महाराज यांच्याशी लग्न करण्यासाठी तिने कट रचला. तिने भय्यू महाराज यांचा अश्लिल व्हिडिओ तयार केला तसेच भय्यू महाराज यांच्यासोबतचे अश्लिल चॅटिंगही सेव्ह करुन ठेवले होते.

अन्यथा परिणामांना सामोरे जा- 

भय्यू महाराज यांनी एप्रिल २०१७ मध्ये आयुषी यांच्याशी लग्न केले. त्या तरुणीला याची कुणकुण लागताच तिने भय्यू महाराज यांच्याकडे लग्नाचा तगादा लावला. तिने भय्यू महाराज यांना एक वर्षांची मुदतही दिली होती. या दरम्यानच्या काळात तिने भय्यू महाराज यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळले होते. पलकने एका वर्षात लग्न न केल्यास तुमचा देखील दाती महाराज करू अशी धमकी भय्यू महाराजांना दिली होती.

तरुणीला शरद आणि विनायकने दिली साथ

या तरुणीसोबतच भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन त्यांचे साहाय्यक विनायक आणि शरद यांचा होता. यासाठी त्यांनी पलकचा वापर करुन घेतला. शरद आणि विनायक ती तरुणी तुमच्याविरोधात शोषणाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे, असे भय्यू महाराजांना सांगायचे. विनायक आणि पलक दोघे महाराजांना अशक्त होणाऱ्या गोळ्या देत असल्याचे समोर आले आहे. या औषधांचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. ज्या गोळ्या द्यायच्या नव्हत्या त्या देताना संशय येऊ नये म्हणून त्याचे कव्हर बदललं जायचं तसेच तिघांच्या चॅटमधून महाराजांकडून खंडणी मागितल्याचं स्पष्ट होतं, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. आत्महत्येनंतर विनायक पसार झाला होता.

या प्रकरणी महाराजांच्या जवळच्या लोकांचा जबाब नोंदवल्यानंतर अनेक गोष्टींची उलघडा झाला. याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी १२५जणांची चौकशी केली. २५ जणांचे जबाब नोंदवले.या प्रकरणी अटक केलेले त्यांचे साहाय्यक विनायक दुधाडे, शरद देशमुख अजूनही अटकेत आहेत. पलकलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही केस न्यायालयात सुरू आहे.

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’

वजन कमी करण्याची ‘ही’ थेरपी करून पाहा

Loading...
You might also like