भय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर, ट्रस्टी म्हणून पत्नी आयुषी यांची निवड

इंदूरः वृत्तसंस्था

राष्ट्रसंत भय्यू महाराज यांची संपत्ती जाहीर करण्यात आली असून, श्री सद्गगुरू धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टमध्ये पत्नी आयुषी यांना ट्रस्टी करण्यात आलं आहे. ट्रस्टी करण्या बाबातचा ठराव 28 जून रोजी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. ट्रस्टचे सचिव तुषार पाटील यांनी आयुषी यांचं नाव अधिकृतरित्या ट्रस्टी म्हणून नावनोंदणी करण्यासाठी पाठवलं आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95c5e10f-9faa-11e8-8fb8-5be14e5ce50a’]
तत्कालीन ट्रस्टी दिलीप माधवराव भांडवलकर यांनी प्रकृतीचे कारण देत 22 जून रोजी आपल्या ट्रस्टीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी आयुषी यांची वर्णी लागली. भय्यू महाराज यांचा सेवक विनायक दुधाले यानेच आयुषी यांच्या संचालक होण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 8 ट्रस्टींनी मान्यता दिली.

अशी आहे भय्यू महाराज यांची संपत्ती
संपत्तीच्या बाबत ट्रस्टने वर्षभराचा आर्थिक अहवाल सादर केला असून, यामध्ये जमीन, वाहन, फर्निचरसह एका-एका वस्तूचा हिशेब देण्यात आला आहे. ट्रस्टच्या इंदूर शाखेकडे जवळपास 1 कोटी 46 लाखांची संपत्ती आहे. इतर ठिकाणाचा हिशोब केला असता तो जवळपास दीड कोटी असल्याचं पुढे आलं आहे.

यामध्ये 76 एकर जमीन, किंमत 84.81 लाख दाखवली आहे. तर ट्रस्टकडे अजून 20 एकरहुन अधिक जमीन आहे. ही जमीन 76 एकर पेक्षाही जास्त आहे. कागदोपत्री याची किंमत 84 लाख 81 हजार दाखवण्यात आली आहे.

ट्रस्टला शेती करण्यासाठी म्हणून 2001 ते 2010 या कालावधीत पाच एकर जमीन मिळाली. तर काही जमीन ही खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यावेळची जमीनीची किंमत कागदोपत्री दाखवण्यात आली आहे. आता या जमिनीची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. तसेच अनेक वाहनंही ट्रस्टच्या नावावर आहे. यात अॅम्बलुन्स, बोलेरो कार, बस, इनोव्हा कार, पजेरो, स्पोर्ट कार, स्कूल बस, मेक्सिमो माईन कार, टाटा मॅजिक आणि दुचाकींचा समावेश आहे. ट्रस्टमधील आश्रमामध्ये एसी, सीसीटीव्ही,एलईडी, मोबाईल आणि अन्य फोन असल्याची माहितीही दिली आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9de558bd-9faa-11e8-be77-1fe326920967′]

दरम्यान भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. या सुसाईट नोटमध्ये आपल्या संपत्तीचा व्यवहार हा सेवक विनायक सांभाळेल असं लिहिलं होतं. मात्र यानंतर भय्यू महाराज यांच्या संपत्तीवरून बराच वाद निर्माण झाल होता. अखेर पत्नी आयुषी यांची ट्रस्टपदी निवड झाल्यामुळे सर्व वादांवर पडदा पडला आहे.