भय्यूजी महाराज यांची गोळी झाडून आत्महत्या

इंदूर : पोलीसनामा आॅनलाईन

राष्ट्रसंत भैय्यू महाराज (वय -४८) यांनी स्वत वर गोळी झाडून घेतली होती. भैय्यू महाराज यांना इंदूर मधील बॉम्बे ह़ॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा उपचारादरम्यान निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भैय्यू महाराजांच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

भैय्यू महाराज त्यांच्या स्वताच्या राहत्या घरी गोळी झाड़ून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी बॉम्बे हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. भैय्यू महाराज यांचा कही काळ मुंबई येथे नोकरी करण्यात गेला. सिरायाराम या कपड्याच्या कंपनीसाठी मॉडेलींग केली. भैय्यू महाराज यांचा लहानपणापासूनच अध्यात्माकडे कल होता. त्यांचे महत्वाच्या राजकीय नेत्यांसोबत घनीष्ठ संबंध होते. त्यांना नुकताच राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आलेला होता. भैय्यू महाराज यांचे महाराष्ट्रात आणि मध्यप्रदेशात असंख्य अनुयायी आहेत.

महाराष्ट्रातील दिवंगत नेते प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. ठाकरे परिवार यांच्याशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यांची पहिली पत्नी मराठवाड्यातील उस्मानाबाद येथील निंबाळकर घराण्यातील होती. त्यामुळे त्यांचे मराठवाड्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यसरकारच्या मदतीने त्यांनी मराठवाड्यात जलसंधरणाची अनेक कामे केली आहेत.