BHEL Recruitment 2021 | ‘या’ पदासाठी भरती; पगार 80 हजारपर्यंत, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  BHEL Recruitment 2021 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (BHEL Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. BHEL च्या कॉर्पोरेट ऑफिसमधील कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपमधील पदांची भरती घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत जाणून घ्या.

 

पदे – एकूण जागा – 10

 

कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपसाठी –

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

  • अर्जदारांनी किमान 70 टक्के एकूण गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा 2 वर्षांचा व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका असणे आवश्यक.
  • नामांकित संस्थांमधून अभियांत्रिकी पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल.
  • किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे, जो एकतर पीजी पदवी किंवा व्यवस्थापनातील 2 वर्षांचा पीजी डिप्लोमा प्राप्त करण्यापूर्वी किंवा नंतरचा चालू शकतो.

नोकरीसाठी पात्रता –

 

  • कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपसाठी नवीन तंत्रज्ञान क्षेत्रातील आवश्यक अभ्यास किंवा संशोधन.
  • प्रगत देशांमधील अलीकडील घडामोडी.
  • धोरण प्लॅन करणे, रोडमॅप आणि अंमलबजावणी यावर इनपुट देण्यात मदत करणे.

 

वयाची अट – 1 नोव्हेंबर 2021 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

वेतन – 80,000 रुपये प्रति महिना

 

कालावधी –

 

ही संधी 1 वर्षासाठी देण्यात येत आहे, पण, तो कालावधी 1 वर्षापर्यंत किंवा असाइनमेंट पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल) वाढवला जाऊ शकतो. कमाल कार्यकाळ 3 वर्षांपर्यंत मर्यादित असणार आहे.

निवड प्रक्रिया –

 

  • अर्जांची तपासणी केली जाईल त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना परस्पर संवादासाठी बोलावले जाईल.
  • इच्छुक उमेदवारांनी www.careers.bhel.in वर नमूद केलेल्या नोकरीच्या पदासाठी स्वारस्य पत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार या लिंकला येथे भेट देऊ शकतात.

https://careers.bhel.in/bhel/static/Advt_YP_CE09_2021.pdf.

अर्ज करण्याची अखेरची तारीख – 30 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाइट – careers.bhel.in

 

Web Title :  BHEL Recruitment 2021 | bhel recruitment 2021 vacancies open

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

Kirit Somaiya | ‘कोरोना काळात पैसे मोजण्यात व्यस्त असल्याने उद्धव ठाकरेंना मानेचं दुखणं सुरु झालं’ – किरीट सोमय्या

Beed Crime | धक्कादायक ! 24 तासात दोन 16 वर्षांच्या मुलींची आत्महत्या; प्रचंड खळबळ