नवी दिल्ली : BHEL Recruitment 2024 | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेलने एसएससी पास उमेदवारांसाठी विविध ट्रेडमधील रिक्त जागा जाहीर केल्या असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे ट्रेड अप्रेंटिसशिप ट्रेनी पदासाठी उमेदवारांची भरती केली जाईल. फिटर टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, सुतार अशा अनेक नियुक्त्या या भरतीद्वारे केल्या जाणार आहेत. इच्छुकांनी BHEL hwr.bhel.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- १४ जून २०२४
- उमेदवार २४ जून २०२४ पर्यंत आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन देखील सबमिट करू शकतात.
पदभरतीचा तपशील :
- फिटर – ५९ जागा
- टर्नर – १७ जागा
- मशिनिस्ट – ४० जागा
- वेल्डर – १९ जागा
- इलेक्ट्रिशियन – २४ जागा
- ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – २ जागा
- इलेक्ट्रॉनिक्स (मेकॅनिकल) – १ जागा
- सुतार – २ जागा
- फाउंड्रीमन – ६ जागा
एकूण १७० पदे भरणार
अर्जासाठी आवश्यक पात्रता :
- उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
- एनसीव्हीटीद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून २०२१, २०२२, २०२३ किंवा २०२४ मध्ये नियमित विद्यार्थी म्हणून किमान ६० टक्के गुणांसह आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक.
हे उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत :
- आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर शिकाऊ प्रशिक्षण घेतलेले किंवा एक वर्ष किंवा त्याहून अधिक नोकरीचा अनुभव असलेले उमेदवार.
- नियमित अभ्यासक्रम करत असलेले उमेदवार
वयोमर्यादा :
- सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे.
- ओबीसी (नॉन क्रीमी लेयर) साठी कमाल वय ३० वर्षे, एससी आणि एसटीसाठी ३२ वर्षे.
- अपंग उमेदवारांना वरील वयात १० वर्षांची सूट.
इतकी मिळेल स्टायपेंड :
भेलमध्ये निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थी मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्टायपेंड दिले जाईल. लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड होईल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Katraj Chowk Accident News | कात्रज चौकात एसटीच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू