Bhendval Prediction | भेंडवळची भविष्यवाणी; राज्यातील रोगराई होणार कमी, पाऊसही चांगला

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Bhendval Prediction | संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत (Bhendval Prediction) आज जाहीर झाले. भेंडवळ घटमांडणी नुसार यंदा रोगराई (Disease) कमी होण्याबरोबर पाऊसही (Rain) चांगला होणार असल्याचे भाकीत केले आहे. जून, जुलैमध्ये पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण जास्त असेल. याशिवाय देशात आर्थिक टंचाई जाणवणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची भविष्यवाणी (Bhendval Prediction) 350 वर्षाहून अधिक काळ अखंडितपणे सुरू आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात (Gujarat), मध्यप्रदेश (Madhya Pradesh), कर्नाटक (Karnataka), मराठवाडा (Marathwada), खान्देश (Khandesh) या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे भाकित सांगितलं जातं. महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ (Chandrabhan Maharaj Wagh) यांनी साधारण 350 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत. सारंगधर महाराज वाघ (Sarangdhar Maharaj Wagh) यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे. (Bhendval Prediction)

गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास करून वर्षभराची भाकिते या घट मांडणीत केली जातात. शेतकऱ्यांचा या भाकितावर खूप विश्वास आहे. या घट मांडणीनुसार जून, जुलै महिन्यात साधारण पाऊस पडेल. ऑगस्टमध्ये चांगला तर सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडेल. महत्त्वाचे म्हणजे अवकाळी पाऊसही राहणार आहे. तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कुठे कमी कुठे अधिक सर्वसाधारण राहील. तर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ज्वारीचे पीक साधारण असून या पिकाची नासधूस होणार असल्याचेही भाकीत केले आहे.

 

याबरोबर मूग, उडीद हे पीक साधारण असून त्याचीही नासाडी होईल. तेलवर्गीय पीक असलेले तीळ पिकाचे भाव साधारण राहतील.
तर भादली हे पीक रोगराईचे प्रतीक असून या वर्षात रोगराईचे प्रमाण कमी असल्याचे भाकीत केले आहे.
तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील मटकी पण साधारण राहील.
विशेष म्हणजे कोरोनासारख्या महामारीतून यावर्षी दिलासा मिळण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.

 

Web Title :- Bhendval Prediction | good rains in the state reduced disease crisis what does the bhendval prediction say

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा