संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, निर्वस्त्र धावली रस्त्यावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भिलवाडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे तीन व्यक्तींनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी या मुलीसोबत असलेल्या तरुणाला मारहाण करत पळवून लावले. आणि त्यानंतर तिला बंधक बनवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यावेळी आरोपींनी मानवतेला काळिमा फासत सगळ्या हद्द पार केल्या.  त्याचबरोबर पीडित तरुणीच्या शरीरावर मोठ्या जखमा देखील झाल्या आहेत. तिने विना कपड्यांचा त्या ठिकाणाहून पळ काढत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर नागरिकांनी तिला कपडे देत तिचे अंग झाकले.

तीन दारुड्यांनी अडविले
सोमवारी रात्री हि पीडित मुलगी आपल्या आईसह पोलीस स्टेशनमध्ये आली आणि आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या पीडितेने दिलेल्या माहितीनुसार,ती एका यात्रेला जाण्यासाठी शाहपुरा येथे आली होती. त्यानंतर तेथून ती आपली मैत्रीण आणि मित्रासह यात्रेला जाण्यासाठी निघाले. यावेळी रस्त्यात तीन जण दारू पीत बसले होते. त्यांनी सर्वांना अडविले.

सोबत असणाऱ्या युवकाला मारून पळवले
त्यानंतर या तीन बेवड्यांनी या सोबत असलेल्या तरुणाला मारहाण करत पळवून लावले. त्याचबरोबर दुसरी मुलगी देखील त्या मुलाबरोबर पळून गेली. मात्र पळून जात असताना पडल्याने पीडित मुलगी त्या दारुड्यांच्या तावडीत सापडली. त्यानंतर त्यांनी तिला शेजारच्या शेतात तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला.

रस्त्यावरील लोकांनी झाकले अंग

मोठ्या प्रमाणात अत्याचार झालेली हि मुलगी त्या नराधमांच्या तावडीतून सुटल्यानंतर निर्वस्त्र रस्त्यावर आली. त्यावेळी रस्त्यावरील नागरिकांनी तिला अंग झाकायला कपडे दिले. त्यानंतर आपल्या आईसह ती मुलगी पोलीस स्टेशनमध्ये आली आणि आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला.

दरम्यान, पोलिसांनी मुख्य आरोपी नारायण गुर्जर आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like