COVID-19 विरुद्ध लढणाऱ्या भिलवाडा येथील डॉक्टरांचा VIDEO झाला व्हायरल (व्हिडीओ)

राजस्थान : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढण्यासाठी संपूर्ण जगातील आरोग्य कर्मचारी काम करत आहेत. भारतात डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र न बघता या महामारीचा सामना करत आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते गात सांगत आहे कि ते हिंदुस्थानी आहेत आणि ते नवीन इतिहास लिहिणार आहेत. जणू या आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतः या महामारीला संपवण्याची शपथ घेतली आहे.

राजस्थानच्या भिलवाडा येथील सरकारी रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याची मनापासून इच्छा असल्याचे या गाण्यातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर अनके लोकं शेअर करत आहेत.

आतापर्यंत ४३ प्रकरणे पॉजिटीव्ह

खरंतर आतापर्यंत राज्यात २३२५ सॅम्पल तपासणीसाठी समोर आले आहेत. यातील ४३ प्रकरणे पॉजिटीव्ह आहेत, तर २१९२ सॅम्पलचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. आता ९० सॅम्पलची तपासणी सुरु आहे. राजधानी जयपूरमध्ये रामगंज भागात पॉजिटीव्ह रुग्ण समोर आल्यानंतर त्यांच्या घराच्या जवळजवळ १ किलोमीटर पर्यंत कर्फ्यू लावला आहे. आरोग्य विभाग या पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत.