…म्हणून आझाद मोदींविरुद्ध लढणार नाहीत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी आपला निर्णय बदलला आहे. दलित मतांमधील फूट टाळून भाजपचा पराभव करण्यासाठी भीम आर्मी सपा-बसपाला पाठिंबा देणार असल्याचे आज आझाद यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यापासून चंद्र शेखऱ आझाद यांनी अनेकवेळा ते मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. आता मात्र त्यांनी निवडणूकीतून माघार घेत बसपाचे उमेदवार सतीश चंद्र मिश्रा यांना पाठिंबा दिला आहे. ‘दलित मतांचे विभाजन होऊ नये म्हणून मी निवडणूक न लढवता सतीश चंद्र मिश्रा यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काही दिवसांपूर्वीच आझाद हे भाजपचे एजंट आहेत आणि ते दलित मतांमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना आझाद म्हणाले, आमचेच लोक आम्हाला भाजपचे एजंट म्हणत असले तरीही मायावती पंतप्रधान व्हाव्यात ही माझी मनापासूनची इच्छा आहे.