Bhima Koregaon case । सुप्रीम कोर्टाकडून नवलखा यांची तुरुंगातून होणार सुटका, घरी नजरकैदेत राहण्याची अटींसह परवानगी

दिल्ली : वृत्तसंस्था – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात (Bhima Koregaon case) अटकेत असलेल्या आरोपी गौतम नवलखा (Gautam Navlakha) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठा दिलासा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव नवलखा यांना कारागृहातून त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात (Bhima Koregaon case) २०१८ साली अटक झाली होती. नवलाखा (Gautam Navlakha) यांच्या मागणीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने मात्र विरोध दर्शवला होता.

 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, एका महिन्यासाठी नवलखा यांना त्यांच्या घरी नजरकैदेत राहता येणार आहे. याशिवाय, मुंबईत त्यांच्यासोबत राहणाऱ्या साहबा हुसैनवरही कोर्टाने कठोर अटी घातल्या आहेत. यामध्ये फोन वापरावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नजरकैदेत असताना नवलाखा यांना इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड किंवा इतर कोणतेही संपर्क साधन वापरण्यास सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे.

 

सुप्रीम कोर्टाने नजरकैदेत असताना होणारा संभाव्य दुरुपयोग टाळता यावा म्हणौन नवलाखा यांना
नजरकैदेत ठेवण्याआधी संबंधित परिसराची तपासणी, पाहणी करण्यास परवानगी दिली आहे.
त्याशिवाय, तपास यंत्रणांना आवश्यक वाटल्यास त्या ठिकाणी पोलीस तैनात करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने नवलाखा यांना त्यांच्या सुरक्षेवरील खर्च म्हणून दोन लाख 40 हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याशिवाय, नवलाखा यांना सीसीटीव्हीच्या निगराणीत राहावे लागणार आहे.
या आधी या प्रकरणातील फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांचा दीर्घकाळ कारागृहात राहिल्याने मृत्यू झाला होता. (Bhima Koregaon case)

 

Web Title :- Bhima Koregaon case । bhima koregaon case supreme court allows house arrest of accused gauttam navlakha with cctv surveillance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharat Jodo Yatra | देशमुख बंधूंची अनुपस्थिती आणि प्रकाश आंबेडकरांच्या भाकितावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

Chandrakant Khaire | संजय राऊतांच्या सुटकेसाठी चंद्रकांत खैरे यांचे थेट देवांच्या कायदामंत्र्याला साकडे

Jacqueline Fernandez | आता न्यायालयाकडून ही ईडीच्या कार्यपद्धतीवर ताशेरे; “जॅकलिनला अद्याप अटक का नाही?”