केंद्र सरकार Vs राज्य सरकार ? भीमा कोरेगाव प्रकरणाच तपास NIA कडे सोपवला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासाची राज्य सरकारने हालचाल सुरु केली असून केंद्र सरकारने देखील मोठे पाऊल उचललं आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात मूळ सुत्रधार बाजूला ठेवून बुद्धिजीवींना अटक हे तत्कालीन राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.

कोरेगाव भीमा प्रकरणात शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहले आहे. शरद पवार यांनी पत्र लिहताच केंद्र सरकारने या प्रकरणात अचानकपणे एंट्री घतली आहे. केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. एनआयएकडे तपास सोपवून केंद्र सरकाने शरद पवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

काय म्हणाले शरद पवार ?
या दंगलीतील मुख्य सत्रधारांना पाठीशी घालून मुख्य मद्यावरून लक्ष हटवण्याचे षडयंत्र तत्कालीन राज्य सरकारने केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. अटक झालेले सुधीर ढवळे यांनी जर्मन कवीची अनुवादित कविता वाचली. ‘जब जुल्म हो तो बगावत होनी चाहीए शहर मै… अगर बगावत ना हो तो बहेतर है की रात ढलने से पहले ये शहर जल कर राख हो जाये…’ यासाठी त्यांना अटक करण्यात आली, असे शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

डॉ. तेलतुंबडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जावई आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गोलपीठामध्ये नामदेव ढसाळ यांची कविता आहे. या कवितेच्या अर्थाचा बोध घेण्याऐवजी ते देशद्रोही आणि समाज विघातक म्हणून निष्कर्ष काढू नका. पोलीस तपास यंत्रणेने संगणकीय उपकरणामध्ये छेडछाड केली, पुरावे नष्ट करणे आणि खोटे पुरावे तयार करणे अशा तक्रारी मला प्राप्त झाल्याचे असून याची चौकशी खोलात जाऊन करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like