गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडेंना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगांव प्रकरणात गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना अटकेपासून दिलेला दिलासा मुंबई हायकोर्टाने कायम ठेवला आहे. अटकपुर्व जामीनावरील सुनावणी कोर्टाने शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे.

दोन वर्षांपुर्वी भीमा कोरेगांव येथील झालेल्या दंगल प्रकरणात गौतम नवलखा यांना 2 डिसेंबरपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. तर, याच प्रकरणात सहआरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबरोबर गौतम नवलखा यांच्याही जामीन अर्जावरील सुनावणी 2 डिसेंबर रोजी ठेवली होती. न्यायमुर्ती पी. डी. नाईक यांच्या एकसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होती. दरम्यान, जातील दंगल प्रकरणात पोलीसांनी भारतीय दंडसंहितेसह बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंधक))कायद्याअंतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल केला होता.

नवलखा यांनी आपल्यावरील गुन्हा रद्द करण्यात यावा, यासाठी 2018 मध्ये हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून नवलखा यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. 15 ऑक्टोबर रोजी त्यांची न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत त्यांना अंतरिम संरक्षण देत संबंधित न्यायालयात जाण्याचे आदेश दिले होते. 12 नोव्हेंबरला त्यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सोमवारी न्यायालयाने त्यांची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. त्यामुळे त्यांना शुक्रवारपर्यंत दिलासा मिळाला आहे.

Visit : policenama.com