भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : आनंद तेलतुंबडे यांची NIA च्या कोठडीत रवानगी

पोलिसनामा ऑनलाइन – आनंद तेलतुंबडे यांच्यावर भीमा-कोरेगाव प्रकरणी गुन्हा दाखल असून ते आज एनआयएसमोर हजर झाले असता न्यायालयाने त्यांना १३ एप्रिल पर्यंत अटक करण्यास मज्जाव केला होता. पण ही मुदत संपल्यावर त्यांनी स्वतः एनआयएच्या कार्यालयात हजेरी लावली. नंतर त्यांची एनआयएच्या कोठडीत रवानगी केली गेली. तेलतुंबडे यांनी एनआयएसमोर समर्पण केले त्यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही हजर होते. तर या प्रकरणातील दुसरी घटना म्हणजे तेलतुंबडे यांच्याबरोबर मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांनीही समर्पण केले आहे.

खरतर मागचे काही दिवस डाव्या संघटनांनी सोशल मोडियावर #DoNotArrestAnand ही मोहीम सुरु केली असून भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा हे मुख्य आरोपी आहेत. गुजरातमधील जिग्नेश मेवानी यांनीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत तेलतुंबडे यांना अटक न करण्याची मागणी केली होती.

नवलखा आणि तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावे, अशी याचिका दाखल केली असताना त्यावर दोघांना खूप वेळ असे संरक्षण दिल्याचे सांगत १४ एप्रिलला त्यांनी शरण जाऊन अटक करून घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. काल आठवड्याची मुदत संपली असून आज मंगळवारी तेलतुंबडे हे शरण आले आणि त्यांची रवानगी एनआयएच्या कोठडीत केली गेली आहे.