कोरेगाव भीमा चौकशी आयोग गुंडाळला ? राज्य सरकारला शिफारसपत्र

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या कोरेगाव भीमा आयोग गुंडाळला जाणार असून, याबाबत आयोगाचे प्रमुख माजी न्यायमुर्ती जयनारायण पटेल यांनी सरकारला शिफारस पत्र दिले आहे. अपुरा निधी आणि पगार यासह वेगवेगळ्या कारने त्या मागे आहेत.

कोरेगाव भीमा येथे दोन धर्मात झालेल्या वादातून दंगल उडाली होती. अनेक वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक प्रकार घडले होते. यात एका तरुणाचा जीवही गेला होता. याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान प्रकरणाची पार्दर्शकपणे चौकशी करण्यात यावी यासाठी निवृत्त न्यायमुर्ती जयनारायण पटेल यांच्या नियंत्रणाखाली चौकशी आयोगाची निर्मिती शासनाने केली होती. यात चौकशी आयोगात 7 कर्मचारी काम करतात. मात्र, गेल्या आठ महिन्यापासून त्यांचे पगार थकलेले आहेत. तसेच स्टेशनरी घेण्यासाठी देखील आयोगाला आर्थिक अडचणी येत आहेत.

त्यामुळे चौकशी आयोगात पुर्ण वेळ काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच कारणातून अपुरा निधी, वेळेत पगार न देणे, सरकारचे या बाबातीत गांभीर्य नसणे आदी कारणातून कोरेगाव भीमा चौकशी आयोग गुंडाळण्याची शिफारस आयोगाचे प्रमुख माजी न्यायमुर्ती जयनारायण पटेल यांनी सरकारकडे केली आहे.