भीमा कोरेगाव : पुणे पोलिस तपासासाठी घेणार FBI ची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास आता वेगळ्या वळणावर आला आहे. या प्रकरणात पुणे पोलीस नव्याने तपास करत असून यातून नवी माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. या तपासात पुणे पोलीस थेट अमेरिकेची तपास संस्था असलेल्या FBI (Federal Bureau of Investigation) ची मदत घेणार आहे. या प्रकरणात अटकेत असलेले वरावर राव यांच्यावर माओवादी चळवळीला मदत केली असल्याचा ठपका आहे.

पोलिसांनी राव यांच्या घरी छापा घालून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र, यातून मोठ्या प्रमाणावर डेटा डिलीट करण्यात आला होता. तो डेटा पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस FBI ची मदत घेणार आहे. हार्ड डिस्कमधील डिलीट डेटा पुन्हा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक अमेरिकेला जाणार आहे.

1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमिवर हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडेंसह 163 जणांवर जिल्हाबंदी घालण्यात आली आहे. भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन संमारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला होता. याप्रकरणी संभाजी भिडे व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/