खडकवासलामध्ये भाजपचे भीमराव तापकीर विजयी, सचिन दोडकेंचा धक्कादायक पराभव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भीमराव तापकीर यांचा मोठ्या मताधिक्यांने विजयी झाले आहेत. खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या भीमराव तापकीर यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांना टफ फाइट देत विजय मिळवला. या मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले होती. परंतू या दोघांमधील लढत चांगलीच चुसशीची ठरली.

मतमोजणी सुरु झाल्यापासून दोघा जोरदार टक्कर दिसत होती. दुपारी 2 च्या सुमारस भीमराव तापकीर 3 हजारच्या लीडवर होते. भीमराव तापकीर 117407 मते होती तर सचिन दोडके यांना 114423 मते होती. दोघांनी आपल्या मतदारसंघात जोरदार ताकद पणाला लावली होती. कार्यकर्त्यांनी तर आपल्या उमेदवारांचे निकालाआधीच विजयाचे बॅनर लावले होती. परंतू अखेर भीमराव तापकीर यांनी विजयी होत गुलाल उधळला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या भीमराव तापकीर यांनी 1 लाख 11 हजार 531 मते विजय मिळवला होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे होते. त्यांना 48 हजार 505 मते मिळाली आणि त्यांचा 63 हजार 026 मतांनी पराभव झाला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर मनसेचे राजाभाऊ लायगुडे, चौथ्या स्थानावर शिवसेनाचे श्याम देशपांडे आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे श्रीरंग चव्हाण होते.

1. भिमराव (अण्णा) धोंडिबा तापकीर (भारतीय जनता पार्टी) – 120518 मते
2. दोडके सचिन शिवाजी (राष्ट्रवादी) – 117923 मते
3. अरुण नानाभाऊ गायकवाड (बहुजन समाज पार्टी) – 1182 मते
4. आप्पा आखाडे (वंचित बहुजन आघाडी) – 5931 मते
5. ॲड. बगाडे राहुल भगवान (बहुजन मुक्ती पार्टी) – 657 मते
6. बलाढे दिपक बबनराव (अपक्ष) – 266 मते
7. डॉ.बाळासाहेब अर्जुन पोळ (अपक्ष) – 334 मते
8. NOTA – 3561 मते

Visit : Policenama.com