खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांचा विजय, सचिन दोडकेंची झुंज अपयशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहेत. खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या भीमराव तापकीर यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांना टफ फाइट देत विजय मिळवला. या मतदारसंघात 51.35 टक्के मतदान झाले होते. परंतू या दोघांमधील लढत चांगलीच चुसशीची ठरली.

मतमोजणी सुरु झाल्यापासून दोघांत जोरदार टक्कर दिसत होती. दुपारी 2 च्या सुमारस भीमराव तापकीर 3 हजारच्या लीडवर होते. भीमराव तापकीर 117407 मते होती तर सचिन दोडके यांना 114423 मते होती. दोघांनी आपल्या मतदारसंघात जोरदार ताकद पणाला लावली होती. कार्यकर्त्यांनी तर आपल्या उमेदवारांचे निकाला आधीच विजयाचे बॅनर लावले होती. परंतू अखेर भीमराव तापकीर यांनी विजयी होती गुलाल उधळला.

मागील विधानसभा निवडणुकीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या भीमराव तापकीर यांनी 1 लाख 11 हजार 531 एवढी मते घेत विजय मिळवला होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस चे दिलीप बराटे होते. त्यांना 48 हजार 505 मते मिळाली होती. त्यांचा 63 हजार 026 मतांनी पराभव झाला होता. खडकवासला विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर मनसेचे राजाभाऊ लायगुडे, चौथ्या स्थानावर शिवसेनेचे श्याम देशपांडे आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे श्रीरंग चव्हाण होते.

Visit : Policenama.com