Bhimashankar Temple | भीमाशंकर मंदिर परिसरात मोबाइल वापरास बंदी, मंदिर प्रशासनाचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhimashankar Temple | बारा ज्योर्तिलिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सध्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अधिक श्रावण महिना सुरू असल्यामुळे ही गर्दी होत आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावणात ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर (Bhimashankar Temple) परिसरात मोबाइल वापराला बंदी (Mobile Phones Ban) घालण्यात आली आहे, अशी माहिती श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानच्या (Sri Kshetra Bhimashankar Sansthan) वतीने देण्यात आली आहे.

श्रावणात (Shravan) सुरक्षिततेच्या दृष्टीने गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरामध्ये गर्दी होऊन भाविकांची गैरसोय होऊ नये, दर्शन सुलभतेने व्हावे, तसेच कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि मंदिराचे (Bhimashankar Temple) पावित्र राखले जावे यासाठी मोबाइल वापरास, फोटो काढणे किंवा चित्रफित काढण्यास बंदी करण्यात आली आहे. भाविकांनी गाभारा, मुख्य मंडप आणि मंदिर परिसरात छायाचित्रे काढू नयेत, तसेच मोबाइल बंद ठेवून सहकार्य करावे.

या आवाहनानंतरही मंदिर परिसरात मोबाइल वापरताना किंवा छायाचित्र काढताना आढळल्यास मंदिर संस्थानाकडून
दंडात्मक कारवाई (Punitive Action) करण्यात येईल, असेही मंदिर संस्थानकडून कळविण्यात आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Yerwada Central Jail | येरवडा खुले कारागृहातील बंदी संचलित श्रृंखला उपहार गृह, पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटरचे उद्घाटन

Maharashtra Political News | नरेंद्र मोदींनी काल खोटं सांगितलं, भाजप-शिवसेना युती कशी तुटली खडसेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट