भीमथडी बनली महिला बचत गट व ग्राहकांमधील दुवा.!

सुरू केला हा अभिनव उपक्रम...

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भीमथडी जत्रा ही मागील 14 वर्षांपासून पुण्यात भरवली जाते. ग्राहक व महिला बचत गटांचा सुरेख संगम आपल्याला या जत्रेत पाहायला मिळतो. आता पर्यंत जवळपास 3,500 महिला बचत गटांतील 3 लाख पेक्षा जास्त महिलांना भीमथडीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली. वर्षांतून एकदा भरवली जाणारी भीमथडी जत्रा चार दिवसांतचं महिलांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देते.

मात्र, कोरोनामुळे परिस्थिती बदली. महिलांचे व्यवहार ठप्प झाले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातून मार्ग काढत, भीमथडी आता ऑनलाईन रुपात येत असून कारागिरांना व महिला बचत गटांना यातून मोठी संधी निर्माण करत आहे. कारागिरांचे व महिला बचत गटांचे उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत भीमथडी जत्रेच्या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून पोहचवणार आपला प्रयत्न असणार आहे. ग्राहकांना उत्पादनांची संपूर्ण माहिती भीमथडीच्या अधिकृत फेसबुक पेज वर मिळू शकते. तसेच ग्राहक त्यांना आवडलेल्या वस्तू थेट उत्पादकांना फोन करून खरेदी करू शकतील. ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक असून यातून आपल्या अर्थव्यवस्थेचे आणि समाजाचे महत्वपूर्ण घटक असलेल्या महिला बचत गट व कारागिरांना मदत मिळावी हाच प्रामाणिक हेतू असल्याचे भीमथडीच्या संस्थापिका सौ. सुनंदा पवार यांनी सांगितले.

सौ. सुनंदा पवार यांनी नेहमीच महिला सबलीकरण व महिला सक्षमीकरणावर भर देत असतात. याच माध्यमातून त्यांनी भीमथडीची स्थापना करून देशभरातील महिला बचत गट, हातमागावर काम करणारे विणकर, यांना रोजगार निर्मिती करून दिली आहे.