‘अकाऊंट’मधून काढत होता दुसर्याचेच पैसे, नंतर म्हणाला – ‘मला वाटलं मोदीजींनी खात्यात भरलेत’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एसबीआयच्या एका शाखेत अजब प्रकार उघडकीस आला आहे. एकच अकाउंट नंबर दोन जणांना देण्यात आल्याने मोठी गडबड झाली आहे. मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातील हा प्रकार असून यावेळी एक खाते क्रमांक दोन जणांना देण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
झाले असे की, या खात्यामध्ये एक व्यक्ती पैसे टाकत राहिला आणि दुसरा ग्राहक त्याला सरकारी पैसे समजून वापरत राहिला असे सहा महिन्यांपर्यंत सुरु होते. या कालावधीमध्ये तब्बल 89 हजार रुपए खात्यातून काढण्यात आले. आलमपूर मधील रुरइ गाव आहे येथे राहणाऱ्या हुकुम सिंह यांनी बँकेत खाते उघडले. 12 नोव्हेंबर 2018 रोजी त्यांना बँकेचे पासबुक मिळाले. त्यानंतर ते हरियाणाला गेले. तेथे पैसे कमावून ते आपल्या खात्यामध्ये टाकत असत. घरी परत आल्यावर पैसे काढायला गेले असता त्यांना समजले की खात्यातून 89 हजार रुपये कमी झालेले आहेत.
यानंतर तत्काळ बँकेत धाव घेतली एकाच खाते क्रमांक दोन जणांना देण्यात आल्याचे समजले. या खात्याचा दुसरा मालक रोनी गावातील हुकुम सिंह बघेल हे आहेत. मग दोन्हीही हुकूम सिंह यांना बँकेत बोलावण्यात आले. हुकूम सिंह बघेल यांनी सांगितले की ते आधार सेंटरवर जाऊन मशीनवर आंगठा लावून पैसे काढत होते.
जेव्हा त्यांना विचारण्यात आले की जर तुम्ही खात्यात पैसे टाकतच नसाल तर मग पैसे काढण्यासाठी का जात होता ? त्यावर हुकूम सिंह यांनी सांगितले की मला वाटत होते की खात्यात पैसे मोदीजी टाकत आहेत, म्हणून मी हे पैसे काढत होतो. त्यानंतर बँकेने त्यांच्याकडून लेखी घेतले की तीन हफ्त्यांमध्ये ते हुकूम सिंह यांना 89 हजार रुपये परत करतील आणि बघेल यांनी सुद्धा कागदावर अंगठा देत सर्व पैसे परत करणार असल्याचे सांगितले.
Visit : Policenama.com
- रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी खा पिस्ता, ‘हे’ आहेत ९ खास फायदे
- पूर्ण शाकाहारी ‘डाएट प्लॅन’ने वजन करा कमी, जाणून घ्या महत्वाच्या ६ टिप्स
- केसरचे ‘हे’ उपाय केल्याने होतील ‘हे’ ४ महत्त्वाचे फायदे, जाणून घ्या
- वयाची चिंता नको, पन्नाशितील ‘या’ ५ कलाकारांकडून घ्या प्रेरणा…रहा फिट
- ‘या’ जोडप्याने घटवले तब्बल १८१ किलो वजन, तुम्ही सुद्धा घेऊ शकता आदर्श
- महिलांनो, ‘कार्डिओ’ व्यायामासह बिनधास्त करा ‘वेट ट्रेनिंग’, हे आहेत ४ फायदे
- ट्रेनर ‘सर्टिफाइड’ आहे की नाही, कसे तपासावे? ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
- विसरभोळेपणा वाढलाय का? दुर्लक्ष करू नका ‘हा’ आजारही असू शकतो
- नर्व्हस, अस्वस्थ झाल्यासारखे वाटतेय ? मग हे ११ सोपे उपाय करा
- नकारात्मक विचार घालवून ‘रिफ्रेश’ होण्यासाठी ‘हे’ करा, होतील हे ५ फायदे