सोनाक्षीसाठी ‘भीष्म’ मुकेश खन्नांना भिडले ‘दुर्योधन’ पुनीत इस्सर ! ‘कृष्ण’ नितीश भारद्वाज यांनीही केला होता अभिनेत्रीचा ‘बचाव’

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री सोनाक्षीला रामायणावरील एका सोप्या प्रश्नाचं उत्तर न आल्यानं अभिनेता आणि शक्तीमान फेम मुकेश खन्ना यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता यावरून चांगलाच वाद सुरू झाला आहे. आता महाभारतातील दुर्योधन म्हणजेच पुनीत इस्सर यांनी भीष्मावर म्हणजेच मुकेश खन्नांवर टीक केली आहे. याआधीही महाभारतमधील कृष्ण नितीश भारद्वाज यांनीही मुकेश यांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले दुर्योधन पुनीत इस्सर

एका मुलाखतीत बोलताना पुनीत म्हणाले, “मुकेश खन्ना यांनी असं नाही करायला पाहिजे. सोनाक्षी एव्हीएमची स्टुडेंट आहे. माझी मुलंही तिथेच गेली होती. जर तिला केबीसीमधील एखादा प्रश्न येत नसेल तर दुनिया संपलेली नाही. एखाद्याला सर्वांसमोर लाजिरवाणं का वाटू द्यावं. कमीत कमीत जे खन्ना म्हणाले आहे मी ते नाही म्हणत. जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुम्ही मोठेपणा दाखवायला हवा. जेव्हा फळं येतात तेव्हा झाडानं वाकायला हवं.”

कृष्ण नितीश भारद्वाज यांनीही सोनाक्षीचा बचाव करताना म्हटलं होतं की, “मी माझे मित्र मुकेश खन्ना यांना सांगू इच्छितो की, “एका पूर्ण पिढीला आणि भारतीय वारसा आणि साहित्यबद्दल काहीच माहिती नाही असंही असू शकतं. यात त्यांची चूक नाही. यात कोणाचा दोष असेल तर तो पहिल्या पिढीचा आहे ज्यांनी आपल्या मुलांना भारतीय वारसा आणि साहित्याची ओळख करून दिली नाही. यात आपल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचाही दोष आहे जी ब्रिटीश राजवटीच्या काळातील आहे.