भिवंडीत ४ मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यु, ५ जण गंभीर जखमी

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाइन – येथील शांतीनगर परिसरातील पिरानी पाडामधील एका चार मजली इमारतीला तडे गेल्याचे समजल्याने मध्यरात्री इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात येत असतानाच ती कोसळली. त्यात दोघांचा मृत्यु झाला असून आत्पकालीन विभागातील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मध्यरात्री दीड वाजता घडली.

पिरानी पाडा येथील ही चार मजली इमारत फक्त ८ वर्षे जुनी आणि बेकायदेशीर होती. इमारतीला शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तडे पडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रहिवाशांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशामक दल, शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधील कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात येत असतानाच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली. इमारत रिकामी करण्याचे काम सुरु असताना आपत्कालीन कक्षातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह सुमारे १० ते १५ जणांवर इमारतीचा ढिगारा कोसळला. त्यात हे कर्मचारी किरकोळ जखमी झाले.

त्यात सिराज अहमद अन्सारी (वय २६) आणि आखीब (वय २२) यांचा मृत्यु झाला. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम एनडीआरएफ, अग्निशामक दल करीत आहेत. ही इमारत बिल्डर मुन्नवर अन्सारी याने बांधली असून ती केवळ ८ वर्षे जुनी आहे. ती बेकायदेशीर असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like