भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर, पालिकेचे 2 अधिकारी निलंबित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटे कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 18 वर पोहचली आहे. तर 25 जण जखमी झाले आहे. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास 40 वर्षे जुन्या या इमारतीत 40 कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. या इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

भिवंडीतीली इमारत दुर्घटना प्रकरणात महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी पालिकेचे तत्कालीन प्रभाग समितीचे 3 चे सहाय्यक आयुक्त आणि प्रभाग इंजिनिअर अशा दोघांना सोमवारी तडकाफडकी निलंबित केले आहे. सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव असे निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

याशिवाय अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली इमारत दुर्घटना प्रकरणी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक नगररचनाकार प्रल्हाद होगे पाटील, उपायुक्त दिपक सावंत, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून चौकशी करुन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश आयुक्त डॉ. आशिया यांनी दिले आहेत.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे

1. झुबेर खुरेशी (वय-30)
2. फायजा खुरेशी (वय-5)
3. आयशा खुरेशी (वय -7)
4. बब्बू (वय-27)
5. फातमा जुबेर बबु (वय-2)
6. उजेब जुबेर (वय-6)
7. फातमा जुबेर कुरेशी (वय-8)
8. असका आबिद अन्सारी (वय-14)
9. अन्सारी दानिश अलिद (वय-12)
10. सिराज अहमद शेख (वय-28)
11. नाजो अन्सारी (वय-26)
12. सनी मुल्ला शेख (वय-75)
13. अस्लम अन्सारी (वय-30)
14. नजमा मुराद अन्सारी (वय-52)
15. आमान इब्राहिम शेख (वय-22)
16. अफसाणा अन्सारी (वय-15)
17. शाहिद अब्दुला खान (वय-32)
18. असद शाहिद खान (वय-3)

सुखरुप सुटका करण्यात आलेल्यांची नावे

1. हेदर सलमानी (वय-20)
2. रुकसार खुरेशी (वय-26)
3. मोहम्मद अली (वय-60)
4. शबीर खुरेशी (वय-30)
5. कैसर सिराज शेख (वय-27)
6. रुकसार जुबेर शेख (वय-25)
7. मोमीन शमीऊहा शेख (वय-45)
8. अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (वय-18)
9. आवेश सरोजुद्दीन अन्सारी (वय-22)
10. जुलेखा अली शेख (वय-52)
11. उमेद जुबेर कुरेशी (वय-4)
12. अमीर मुबिन शेख (वय-18)
13. आलम अन्सारी (वय-16)
14. अब्दुला शेख (वय-8)
15. मुस्कान शेख (वय-8)
16. नसरा शेख (वय-17)
17. इंब्राहिम (वय-55)
18. खालिद खान (वय-40)
19. शबाना शेख (वय-50)
20. जरीना अन्सारी (वय-45)