Bhiwandi Crime | भिवंडीत दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला दिले पेटवून

भिवंडी : Bhiwandi Crime | काही दिवसापासून महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यातच आता भिवंडीतील एका संतापजनक घटनेची त्यामध्ये भर पडली (Bhiwandi Crime) आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. हि घटना गुरुवारी सायंकाळी घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज याने आपली पत्नी रुकसानाकडे दारू घेण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या फिरोजने रुकसानाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी रुकसाना हिने तात्काळ आग विझवत घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुरुवारी सायंकाळी भिवंडीतील शांतीनगर (Bhiwandi Crime) परिसरात हि घटना घडली असून फिरोज याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे असे पोलीस अधिकारी जयमाला वसावे यांनी सांगितले.

Web Titel :- Bhiwandi Crime | bhiwandi woman set on fire by husband over she denied money for liquor thane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ओळख कशाला करुन देतो, असे म्हटल्याने टोळक्याने मारहाण करुन केली तोडफोड; वारजे माळवाडीमधील घटना

Maharashtra Cinema Hall Reopen | राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Pune Crime | अनैतिक संबंधातून 17 वर्षाच्या मुलीने दिला मुलाला जन्म; 20 वर्षीय बाप आला ‘गोत्यात’