उच्चशिक्षित पतीने हुंड्यासाठी दिला व्हॉट्सअ‍ॅपवरुन ट्रिपल तलाक

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन – काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदी घातली आहे. परंतु अद्यापही तिहेरी तलाकच्या घटना सुरु आहेत. भिवंडीत एका महिलेला पतीने व्हॉट्सअ‍ॅपवरुन ट्रिपल तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. आरजू शेख (वय-२३) असे पीडितेच्या नाव असून तिने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पीडितेचा पती उच्चशिक्षित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , आरजू शेखचा निकाह पाच वर्षांपूर्वी नदीम शेखसोबत झाला होता. नदीम शेख टेक्निकल इंजिनीअर आहे. त्यांना एक मुलगाही आहे. आरजू ही गृहिणी असून ती पायाने अपंग आहे.लग्नात हुंडा दिला असतानाही हुंड्यासाठी आरजूचा छळ सुरु झाल्याचा आरोप होत आहे. मागील काही महिन्यांपासून नदीमने फ्लॅट घेण्यासाठी १० लाखांचा हुंडा मागितला. तो न दिल्यामुळे आपल्याला बेदम मारहाण करुन घराबाहेर काढण्यात आल्याचा आरोप आरजूने केला आहे. तसेच पती नदीम तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करत होता असाही आरोप तिने आपल्या तक्रारीत केला आहे.

तिहेरी तलाक ठरेल अजामीनपात्र गुन्हा, पतीला ३ वर्षे तुरुंगवास; कॅबिनेटने दिली मंजुरी –

तिहेरी तलाक विधेयकानुसार , एका वेळी तीनदा तलाक म्हणून, लेखी स्वरूपात, ई-मेलद्वारे, एसएमएस किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पत्नीशी फारकत घेणे बेकायदा आणि अजामीनपात्र गुन्हा ठरेल. असा तलाक देणाऱ्या पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकेल. शिवाय वर दंडही आकारला जाईल.

Loading...
You might also like