आमदार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठींबा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे.

भोई समाजाची शिखर संस्था असलेल्या भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टने माजी नगरसेवक शंकर जगताप तसेच स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्याकडे आमदार जगताप यांना पाठिंबा देणारे पत्र दिले. यावेळी भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष नितीन कराळे, उपाध्यक्ष अशोक जम, सचिव हनुमान शिनगारे, खजिनदार योगेश घुमे, कार्याध्यक्ष रघुनाथ मुसळे, सहसचिव किरण शिनगारे, विनायक कऱ्हाळे, प्रमुख सल्लागार श्रीकांत धुमाळ, हिशोब तपासणीस संदिप कारळे, सदस्य चेतन तारू, रविंद्र वाघवले, नितीन शिनगारे, गोरखनाथ काटवटे, दिलीप भोकरे, मंगल भोकले आदी उपस्थित होते.

नितीन कराळे म्हणाले, “चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास हा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याने आणि परिश्रमाने झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वाधिक विकासशील मतदारसंघ म्हणून चिंचवड मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघात झालेला विकास हा संपूर्ण शहरात चोहोकडे होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार म्हणून निवडून येत पुढे मंत्री होणे गरजेचे आहे.”

आमदार लक्ष्मण जगताप यांना दिलेल्या या पाठिंब्याबद्दल माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि भोई समाज बांधवांचे आभार मानले. भोई समाजाच्या पाठिंब्याच्या बळावर आमदार लक्ष्मण जगताप चिंचवड मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्वासही शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like