भोईटे गुरुजी यांना ‘डॉ.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाच्या वतीने ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील ग्रंथालय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे गुरुजी यांना विभागीय स्तरांवरील डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते बुधवारी मुंबईत देण्यात आला.

सेवानिवृत्त असणारे ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी कोथळे येथे वाचन संस्कृती रुजावी यासाठी १९६४ साली जनसेवा वाचनालय आणि ज्ञानरंजन वाचनालय ग्रंथालयाची प्रशस्त इमारत उभी केली असून सहा हजार विविध पुस्तके ग्रंथालयात आहेत.

त्याप्रसंगी भोईटे यांच्या समवेत सहकारी ह.भ.प. जगन्नाथ वारघडे महाराज, सदाशिव अण्णा चिकणे, किसनभाऊ देवकर, नीरा बाजार समितीचे संचालक ॲड. धनंजय भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.