अभिनेता ‘पवन’ सिंहच्या विरोधात ‘अक्षरा’ने दाखल केली ‘FIR’, ‘प्रतिमा’ मलिन करत असल्याचा आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोजपुरी स्टार पवन सिंह आता वादाच्या भौवऱ्या सापडला आहे. पवन सिंह याच्या विरोधात मुंबईच्या मालवाडी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने यासंबंधित तक्रार दाखल केली होती. यानंतर आयपीसीच्या कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अक्षराचा आरोप आहे की, पवन आणि त्याच्या कुटूंबाने सोशल मिडियावर तिची प्रतिमा खराब केली आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय अश्लील भाष्य देखील केले आहे.

पवनकडून अक्षरावर हल्ला –

अक्षराने आरोप केला आहे की, सोशल मिडियावर तिला अश्लील प्रतिक्रिया, अपत्तिजनक फोटो आणि व्हिडियो पोस्ट करण्यात येत आहेत. या सर्वामागे पवन सिंहचा हात आहे. तिने एफआयआरमध्ये असे देखील लिहले आहे की, पवन सिंहच्या सांगण्यावरुन तिच्यावर हल्ला देखील करण्यात आला.

3 वर्षांची शिक्षा –

पवन आणि अक्षरामध्ये काही दिवसांपासून वाद सुरु आहे. अक्षराच्या एफआयआरनंतर पवन सिंहवर आयपीसी ५०९, आयटी एक्ट ६६ (A), ६६ (E), ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटी अॅक्ट नुसार पवनला यामुळे ३ वर्षापेक्षा आधिक वर्षाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय त्याला दंड देखील घरावा लागू शकतो.

अक्षरा आणि पवन सिंह यांच्याकडे एक चांगली जोडी म्हणून पाहिले जात होते. या दोघांमध्ये या आधी रिलेशनशिप देखील होती. अक्षराने असे देखील सांगितले आहे की, ब्रेकअपनंतर त्यांच्यातील नाते खराब झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त