अभिनेत्री अक्षरा सिंहनं शेअर केले ‘तसले’ फोटो, चाहते म्हणाले – ‘जंगली जवानी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस अक्षरा सिंहनं इंस्टाग्रामवरून तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायल होताना दिसत आहेत. अक्षराच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आपल्या फोटोंमुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अनेक चाहत्यांनी तिचं कौतुक करताना कमेंट केली आहे. कोणी तिला ब्युटीफुल म्हटलं आहे तर कोणी माईंड ब्लोईंग. कोणी तिला ब्युटी क्वीन म्हटलं आहे तर कोणी जंगली जीवानी असंही म्हटलं आहे.

खासगी आयुष्यातील बोलायचं झालं तर आपला कोस्टार पवन सिंह सोबत तिने फक्त सिनेमेच नाही केले तर दोघे लाँग टाईम रिलेशनशिपमध्ये होते. वर्षभरापूर्वी पवन सिंहने तिसरे लग्न केले. यानंतर तिने त्याच्यासोबत रिलेशन तोडले. एवढंच काय तर तिने याबद्दल एफआयआर दाखल करण्यापर्यंतही उमेश कुमार उपाध्यायसोबत चर्चो केली. एका मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत.

नात्यात दरी कशी आली हे सांगताना अक्षरा म्हणाली की, “गेल्या वर्षभरापासून आम्ही सोबत काम करत नाहीत. एकेकाळी आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झालं. यानंतर सोबत राहणं मला मंजूर नव्हतं. परंतु त्याची वर्तणूक अशी होती की, एखादी अ‍ॅक्ट्रेस सोडून जाईल कशी ? सर्व्हाइव कशी करेल ? माझ्या पायांवरच पडणार. पंरतु हे सगळं मला पटत नव्हतं. यानंतर तो मला इंडस्ट्रीतून आऊट करण्यासाठी प्रयत्न करू लागला. मला सिनेमातून हटवू लागला. प्रत्येक ठिकाणी माझ्याविषयी निगेटीव बोलू लागला. याबाबत मी मीडियाशी बोलले तेव्हा मला मारण्याची धमकी दिली गेली. मला बोलला की, एखाद्या न्यूड फोटोवर तुझा चेहरा लावून व्हायरल करेल. मला हे सगळं सहन नव्हतं होतं. अखेर मी तक्रार दाखल केली.”

अक्षराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर 2011 साली आलेल्या प्राण जाई पर वचन न जाई या सिनेमातून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अक्षरा सिंह गेल्या 9 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 26 वर्षीय अक्षरा मुंबईची रहिवासी आहे. तिनं भोजपुरी इंडस्ट्रीत आज आपलं स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे.

 

You might also like