‘बाथटब’मध्ये TV ची ‘डायन’ मोनालिसाचा BOLD अंदाज (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी अ‍ॅक्ट्रेस मोनालिसानं लहान पडद्यावर बरीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या ती ‘डायन’ या मालिकेमध्ये काम करत आहे. चाहत्यांचं खूप प्रेम तिला मिळताना दिसत आहे. मोनालिसा सोशल मीडिया लव्हर आहे. सोशलवर नेहमीच ती सक्रिय असते. चाहत्यांसाठी हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करायला तिला खूप आवडतं. नुकतेच मोनालिसाचे बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाले आहेत.

मोनालिसानं इंस्टाग्रामवरून तिचे बाथटबमध्ये अंघोळ करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला होता. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आल्याचं दिसत आहेत. फोटोत दिसत आहे की, बाथटबच्या बाजूला फुलं आहेत. बाथरूममध्ये मंद लाईटही आहे. खूपच रोमँटीक वातावरण झाल आहे. यावेळी बाथटबमध्ये अंघोळ करणारी मोनालिसा कमालीची सेक्सी दिसत आहे. आपल्या हॉटनेससाठी फेमस असणाऱ्या मोनालिसानं पुन्हा एकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मोनालिसाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉप 10 अ‍ॅक्ट्रेसमध्ये मोनालिसाचेही नाव येते. जेव्हा बोल्डनेस आणि ग्लॅमरबद्दल बोललं जातं तेव्हा मोनालिसाचं नाव आधी घेतलं जातं. ‘भोले शंकर’ या 2008 साली आलेल्या सिनेमातून मोनालिसानं भोजपुरी इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. सध्या मोनालिसा नजर या टीव्ही सीरीयलमध्ये दिसते आहे. हा शो एक सुपरनॅचरल शो आहे.

Visit : policenama.com