मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा एक अभिनेत्री असल्यासोबतच चांगली डान्सर आहे. सोशल मिडियावर नेहमी तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि बोल्ड फोटो व्हायरल होत असतात. नुकताच मोनालिसाचा एक डान्सचा व्हिडिओ चाहत्यांच्या समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तेजीने व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ स्वतः मोनालिसाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये मौनी रॉयचे सुपरहिट गाणे ‘गली गली में फिरता है तू क्यों बनकर बंजारा’ मोनालिसाने शानदार डान्स केला आहे. हे गाणे ९० दशकात प्रदर्शित झालेला चित्रपट ‘त्रिदेव’ चे रिमिक्स वर्जन आहे. हे गाणे नेहा कक्कड़ने गायले आहे.

View this post on Instagram

👩🏻🤷‍♀️… #wednesday #mood

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाचा व्हिडिओ चाहत्यांच्या खूप पसंतीस पडला आहे. चाहते तिचे खूप कौतुक करत आहे. एका युजरने मोनालिसाच्या व्हिडिओला कमेंट केली आहे की, ‘तुझा डान्स खूपच शानदार आहे. लव यू मोना.’, दुसऱ्या युजरने लिहले की, ‘हॉट एंड सेक्सी’, तिसऱ्या युजरने लिहले की, जबरदस्त मॅम, तुम्ही खूप चांगले डान्सर आहात.

भोजपुरी इंडस्ट्रीमधील टॉप १० अभिनेत्रींच्या यादीमध्ये मोनालिसाचे नाव येते. जेव्हा ग्लॅमरस आणि बोल्डनेसबद्दल बोलले जाते तेव्हा मोनालिसाचे सगळ्यात पहिले नाव घेतले जाते. मोनालिसा सध्या छोट्या पडद्यावरील ‘नजर’ सीरियलमध्ये दिसत आहे. या शो मध्ये मोनालिसाने डायनची भूमिका साकारली आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

Loading...
You might also like