मुस्लिम कुटुंबात झाला ‘या’ भोजपुरी अभिनेत्रीचा जन्म, जाणून घ्या कसे पडले राणी चटर्जी नाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जी आपल्या पर्सनल लाइफबाबत खुप चर्चेत आहे. नुकतेच राणीने सांगितले की, ती लवकरच बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. राणी चटर्जी भोजपुरी इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. मात्र तिचे खरे नाव राणी चटर्जी नाही.

राणी चटर्जीचे खरे नाव साबिहा अन्सारी आहे. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, राणीने एका मुलाखतीमध्ये राणी चटर्जी नाव कसे पडले यामागील कहानी सांगितली.

राणीने सांगितले होते, 2004 मध्ये मी भोजपुरी चित्रपट ससुरा बडा पैसावाला ची शुटिंग करत होते. एक दिवस आम्ही चित्रपटातील एका दृश्याची शुटिंग मंदिरात करत होतो. शुटिंग दरम्यान काही मीडियाचे लोक माझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले.

तिथे मोठा जमाव शुटिंग पहात होता. यासाठी माझ्या डायरेक्टरने विचार केला की, खरे नाव सांगितले तर नको तो प्रसंग ओढावू शकतो, कारण मी मुस्लिम आहे. यासाठी जेव्हा कुणीतरी मला नाव विचारले तेव्हा त्यांनी म्हटले राणी.

जेव्हा त्यांनी माझे अडनाव विचारले तेव्हा डायरेक्टरला काही समजले नाही, तेव्हा त्यांनी चटर्जी म्हटले. कारण त्यावेळी राणी मुखर्जी खुप फेमस होती. बस असेच माझे नाव राणी चटर्जी पडले.

राणीने पुढे सांगितले – माझे कुटुंबिय या गोष्टीने खुप नाराज झाले, परंतु नंतर त्यांनी मान्य केले. हे नाव माझ्यासाठी खुप लकी ठरले.

राणी चटर्जीने अनेक सुपरहिट भोजपुरी चित्रपट केले आहेत. याशिवाय टीव्ही शो खतरों के खिलाडीमध्ये सुद्धा ती दिसली होती.