home page top 1

अभिनेत्री रानी चटर्जीने जीम ट्रेनरसोबत शेअर केला फोटो , युजर्स म्हणाले, ‘जीम ट्रेनरलाच…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी अॅक्ट्रेस रानी चटर्जी सोशल मीडियावर आपल्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांनाही फिट राहण्यासाठी मदत करतात. असाच तिचा एक फोटो सध्या समोर आला आहे.

नुकताच रानीने आपला जीम ट्रेनर अदनानसोबत एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रानीचा जीम ट्रेनर अदनान वेट ट्रेनिंगसाठी तिच्या पायात वेट (वजन) बांधताना दिसत आहे. रानीने काळ्या रंगाचा स्लीवलेस टीशर्ट घातला आहे. त्यावर मॅचिंग योगा पँटही तिने घातली आहे. रानी या लुकमध्ये खूपच कूल दिसत आहे.

रानीने अदनान सोबतचा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, “तू सर्वात चांगला आहेस… @ _adnankhan_07 मला सपोर्ट करण्यासाठी थँक्स # motivationmonday #with #best #trainer”

रानीची ही पोस्ट सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. रानीच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली आहे की, “भोजपुरी इंडस्ट्रीत मी तुझ्या सारखी स्ट्राँग आणि हार्डवर्किंग अॅक्ट्रेस आजपर्यंत पाहिली नाही.” आणखी एका युजरने म्हटले आहे की, “जिम ट्रेनर को ही दिल दे बैठी हैं क्या आप।” रानीने या कमेंटला दुलर्क्षित करत काहीच उत्तर दिलेले नाही.

रानीला आणि तिच्या जीम ट्रेनरला लोकांनी ट्रोल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. रानी नेहमीच आपल्या जीम ट्रेनर सोबत फोटो आणि व्हिडीओज पोस्ट करत असते. त्यामुळे कोणता ना कोणता युजर तिच्या नात्यावर सवाल उपस्थित करत असतो.

आरोग्यविषयक वृत्त

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

 

Loading...
You might also like