माथेफिरूचा अभिनेत्रीवर गोळीबार ; अभिनेत्री बचावली पण पोलीस जखमी

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील सोनभद्रा येथे एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान एका अभिनेत्रीवर हल्ला झाला आहे. भोजपूरी चित्रपट ‘अभागिन बिटिया’चे शुटींग सुरु होते. त्यावेळी एक माथेफिरू युवकाने चित्रपटाची हिरोईन ऋतू सिंग हिच्यावर बंदुकीचा धाक दाखवत बंदी बनवले. त्यानंतर त्याने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात तेथील एक स्थानिक युवक जखमी झाला.

संबधीत घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचवेळी आरोपीने गोळी झाडली. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडून पिस्तुल ताब्यात घेत आरोपीलाही ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली.

चौकशीत आरोपीने त्याचं ऋतुवर प्रेम असल्याचं सांगितलं. तर गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो सतत पाठलाग करत असल्याचं ऋतुने सांगितलं.

दरम्यान, या घटनेने चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या चित्रपटाचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे. तसंच हे वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा चित्रपटाचं शूटिंग सुरु करू असं सांगण्यात आले आहे.

Loading...
You might also like