‘रिंकु’चं ‘हे’ करवाचौथचं गाणं ‘YouTube’ वर करतंय ‘टॉप’ला ‘ट्रेंड’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा व्रत ठेवतात. रात्री करवा मातेची पूजा करून महिला चंद्र देवाला अर्घ्य देत हे व्रत पूर्ण करतात. करवा चौथ सगळीकडे साजरी केली जाते. सिनेमातही याचं वेगळं स्थान आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या सिनेमातील करवा चौथचा सीन सर्वांनाच लक्षात असेल.

अशात आता भोजपुरीतील करवा चौथचं प्रसिद्ध गाणं सध्या युट्युबवर ट्रेंड करताना दिसत आहे. जीना तेरी गली में का है या भोजपुरी सनेमातील हे गाणं आहे. यात प्रदीप आर पांडे चिंटू आणि रिंकु घोष दिसत आहेत. हे गाणं सध्या युट्युबवर मोठ्या प्रमाणावर पाहिलं जाताना दिसत आहे.

विद्वानांच्या मते, 70 वर्षांनंतर आज शुभ मुहूर्त आहे. ज्यात करवा चौथच्या दिवशी चंद्राचा रोहिणी नक्षत्रात उदय होणार आहे. हे खूप शुभ प्रभाव असणारं मानलं जात आहे.

Visit : policenama.com

 

You might also like