खेसारी आणि काजलचे ‘हे’ हॉट गाणे (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी सिनेमा आजकाल बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत आहे. मग ते चाहत्यांच्या फॉलोसर्सची गोष्ट असो किंवा कमाईची भोजपुरी स्टार कशातच मागे नाही. त्यांचे कोणतेनकोणते गाणे युट्यूबवर ट्रे़ंड होत असते. नुकताच भोजपुरी स्टार खेसारी लाल यादव यांचे एक धमाकेदार भोजपुरी गाणे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या भोजपुरी गाण्यामध्ये खेसारीसोबत काजल राघवानी दिसून येत आहे. दोघांचा डान्स आणि रोमॅन्स सोशल मिडियावर खूप पसंत केले जात आहे. या गाण्याला लाखो लोकांनी पाहिले आहे.

हे गाणे खेसारीचा दमदार चित्रपट ‘दबंग सरकार’ २०१८ मध्ये अक्षय कुमार आणि रजिकांत याचा चित्रपट ‘२.०’ च्या समोर भोजपुरी बॉक्स ऑफीसवर आला होता. याने बिहार आणि झारखंडमध्ये जबरदस्त प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटातील सगळे गाणे चाहत्यांच्या पसंतीस पडले होते. यातील एक गाणे ‘पागल बनाइबे’ याला ९ लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते.

या गाण्यामध्ये खेसारी हिरव्या शर्टमध्ये दिसून आला होता. त्याचबरोबर काजल हिरव्या घागऱ्यामध्ये दिसून आली होती. या गाण्याला तुम्ही आयटम सॉंग म्हणू शकता. या चित्रपटातील अजून एक गाणे ‘मीठा बोली बोल के’ हे देखील चाहत्यांच्या पसंतीस पडले होते. या गाण्याला कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते.

या दोघांबद्दल बोलायचे म्हणले तर यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. खेसारी प्रत्येक भोजपुरी अभिनेत्रीसोबत धमाकेदार परफॉर्मेंस देतो. खेसारीला भोजपुरीमध्ये कॉमेडीचा बादशाह म्हणले जाते. याचे लाखो चाहते आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –