खेसारी लाल बनला ‘साधू’, तपस्या भंग करायला आली ‘अप्सरा’ ! क्षणातच व्हायरल झाला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  भोजपुरी इंडस्ट्रीतील फेमस स्टार खेसारी लाल यादवचं एक धमाकेदार गाणं सध्या इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहे. या गाण्यात खेसारी लाल यादव आणि अ‍ॅक्ट्रेस यशिका कपूर यांचा डान्स आणि रोमँस आहे जो चाहात्यांना खूप भावला आहे.

खेसारी लाल आणि यशिका कपूर यांचं जे गाणं सध्या जोरदार व्हायरल होत आहे जे डमरू सिनेमातील आहे. या सिनेमातील सर्वच गाणी चाहत्यांना आवडली आहेत. परंतु यातील तर पसीना छुटेला हे गाणं चाहत्यांना काही जास्तच आवडलं आहे.

खेसारी आणि यशिकाचं हे गाणं सध्या युट्युबवर ट्रेंड करताना दिसत आहे. चाहत्यांचं या गाण्याला मोठं प्रेम मिळताना दिसत आहे. यशिका आणि् खेसारी यांची रोमँटीक केमिस्ट्रीही साऱ्यांना आवडली आहे. सध्या हे गाणं प्रचंड व्हारस होत आहे. खेसारीसोबतच चाहत्यांना यशिकाच्या डान्स आणि लुकचं खूप कौतुक केलं आहे. गाण्यात दिसत आहे की, खेसारी तपस्येत लीन आहे आणि यशिका अप्सरा बनून त्याची तपस्या भंग करत आहे. अद्याप गाण्याला 118,314,276 म्हणजेच 11 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.