‘या’ दिवशी रिलीज होणार ‘ससुरा बडा पईसावाला 2’, पहिल्या पार्टनं ‘स्टार’ झाले होते खा. मनोज तिवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप खासदार मनोज तिवारी आणि भोजपुरी क्वीन रानी चटर्जी यांनी ज्या सिनेमातून 17 वर्षांपूर्वी करिअरला सुरुवात केली होती त्या सिनेमाचा दुसरा पार्ट या वीकेंडला रिलीज होणार आहे. ससुरा बडा पईसावाला 2 असं या सिनेमाचं नाव आहे. 21 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात यावेळी रानी चटर्जी आणि मनोज तिवारी तर दिसणार नाहीत परंतु त्यांच्या जागी अथर्व सिंह आणि नेहा प्रकाश ही जोडी दिसणार आहे.

ससुरा बडा पईसावाला 2 च्या फर्स्ट पार्टनं अभिनेता ते नेता बनलेल्या मनोज तिवारी यांना भोजपुरी सिनेमातच नाही तर लहान पडद्यावरही एक मोठी ओळख दिली होती. हा सिनेमा भोजपुरी बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. हेच कारण आहे की, चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पहात होते. या सिनेमाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक अजय सिन्हा यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, या सिनेमामुळे ते तणावात आहेत.

अजय सिन्हानं हा सिनेमा म्हणजे एक प्रयोग असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की, हा अ‍ॅक्टर एक्सेस सिनेमा आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भोजपुरी फिम्ल इंडस्ट्रीची दशा आणि दिशा बदलेल असंही ते म्हणाले आहेत.