फेमस भोजपुरी साँग ‘रिंकिया के पापा’चे म्युझिक डायरेक्टर धनंजय मिश्रांचं निधन !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी 2020 अशा काही जखमा देत आहे ज्यांचा कधीच विसर पडू शकणार. इंडस्ट्रीतून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत ज्या थांबायचं नाव घेत नाहीये. कास्टींग डायरेक्टर क्रिश कपूर यानंही खूपच कमी वयात(28 वर्षे) जगाचा निरोप घेतला आहे. यानंतर बॉलिवूडमधील दिग्गज डायरेक्टर बासु चॅटर्जी यांनी जगाचा निरोप घेतला होता. आता भोजपुरी इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे.

भोजपुरी सिनेमातील मेगास्टार मनोज तिवारी यांचं लोकप्रिय गाणी रिंकिया के पापा सहित त्यांच्या अनेक अल्बम्स आणि सिनेमात म्युझिक देणारे प्रसिद्ध भोजपुरी म्युझिक डायरेक्टर धनंजय मिश्रा यांचं निधन झालं आहे. यानंतर भोजपुरी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मिश्रांच्या निधनानंतर आता भोजपुरी स्टार निरहुआ आणि खेसारी लाल यादव यांनी शोक व्यक्त केला आहे.

निरहुआनं ट्विट केलं आहे की, “भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांचे आवडते संगीतकार धनंयज मिश्री जी यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर स्तब्ध झालो आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

खेसारी लालनं ट्विट केलं आहे की, “महान संगीतकार धनंजय मिश्रा आज आपल्यातून गेले. या दु:खाच्या काळात मी धनंजय भैयाच्या कुटुंबासोबत आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.”

मीडिया रिपोर्टनुसार 4 जून 2020 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. मीर भाईंदरमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. असं सांगितलं जात आहे की, अचानक त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना डायबिटीज होता.