पवन सिंह – अक्षरा सिंहचं सर्वात ‘धमाकेदार’ गाणं, 7 कोटी वेळा पाहिला गेला व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम : भोजपुरी सिनेमा सध्या वेगानं पुढे जाताना दिसत आहे. भोजपुरी सिनेमांपासून तर भोजपुरी गाणे, भोजपुरी स्टार्सची फॅन फॉलोविंगदेखील वाढताना दिसत आहे. हेच कारण आहे की, काही दिवसांपासून भोजपुरी गाणे सोशलवर हिट होताना दिसत आहेत. भोजपुरी सिनेमातील रोमँस किंग म्हणवल्या जाणाऱ्या पवन सिंहचं एक गाणं सध्या सोशलवर जबरदस्त व्हायरल होतआहे. खास बात अशी की या गाण्यात पवन सिंहसोबत अक्षरा सिंह दिसत आहे. गाण्यात दोघांचीही शानदार केमिस्ट्री दिसत आहे.

पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांची जोडी सर्वाधिक पसंत केल्या जाणाऱ्या जोडींपैकी एक आहे. या जोडीचं कोणतंही गाणं समोर यायचा उशीर असतो की, ते गाणं हिट होताना दिसतं. यावेळीही या जोडीचं एक जबरदस्त गाणं, दोल्हा पत्ती सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्याला युट्युबवर 7 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

भोजपुरी सिनेमा धडकन मधील हे दोल्हा पत्ती हे गाणं अक्षरा आणि पवन सिंहच्या पॉप्युलर रोमँटीक गाण्यांपैकी एक आहे. भोजपुरी प्रेक्षकही या सर्वाधिक पसंत जोडीला सोबत पाहणं मिस करत आहेत. अशात या जोडीनं केलेले सिनेमे आणि गाणे युट्युबवर जास्त प्रमाणात पाहिले जाताना दिसत आहेत. यामुळेच तर दोल्हा पत्ती गाण्यालाही 7 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

या सुपरहिट जोडीला चाहत्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची खूप इच्छा आहे. परंतु ब्रेकअपनंतर आता अक्षरा सिंह आणि पवन सिंहनं एकत्र काम न करण्याची शपथ घेतली आहे.