YouTube वर पवन सिंहच्या ‘राजस्थानी घाघरा’ची ‘फूलटू’ धमाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपर स्टार पवन सिंग पुन्हा एकदा आपले हिट गाणे घेऊन आला आहे. पवनसिंग यांच्या गाण्याची लोकप्रियता जर पाहिली तर आपल्याला त्याचे इंडस्ट्रीतले स्थान लक्षात येते. पवन सिंग यांनी भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक हिट गाणी आणि चित्रपट दिलेले आहेत.
त्याचे ‘राजस्थानी घागरा’ हे नवीन गाणे यूट्यूबवर आले आहे.

नुकतेच हे गाणं प्रसिद्ध झाले. हे गाणं आतापर्यंत 36 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. या गाण्यात पवन सिंग सोबत प्रियांका सिंगही आहे. ‘राजस्थानी घाघरा’ आदिशक्ती फिल्म्स नावाच्या यूट्यूब चॅनल वरून हे गाणे शेअर करण्यात आले आहे. गाण्याचे बोल अखिलेश कश्यप यांचे आहेत तर पवन सिंग आणि प्रियंका सिंग यांनी हे गाणे गायिले आहे.

पवनसिंग हे भोजपुरी इंडस्ट्रीतील स्टार व रोमान्सकिंग समजले जातात. तसेच ते आपल्या प्रोफेशनल बरोबरच व्यक्तिगत जीवनाबद्दल सुद्धा सतत चर्चेत असतात.

पवन सिंगची जोडी अक्षरा सिंगसोबत सर्वाधिक पसंत केली जाते. ज्या चित्रपटात हे दोघे असतात तो चित्रपट आधीपासूनच हिट मानला जातो. परंतु पवनसिंग आणि अक्षरा यांचे ब्रेकअप झाल्यापासून ते एकत्र दिसत नाहीत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like