#Video : भोजपुरीचं सर्वात लोकप्रिय ‘ऑनस्क्रीन’ कपल झालं ‘विभक्‍त’ ; पण, त्यांचा जुना व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी सिनेमात प्रेक्षकांमध्ये पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांची जोडी म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय जोडींपैकी एक मानली जाते. या जोडीचं कोणतंही गाणं सोशलवर प्रदर्शित झालं की, ते लगेचच जबरदस्त हिट होताना दिसतं. या यादीत याच जोडीचं भोजपुरी गाणं ‘पिपरवा के तरवा’ हे एक आहे. हे गाणं खूप आधी रिलीज करण्यात आलं होतं. सध्या हे गाणं खूप पाहिलं जात असून सोशलवर खूप हिट होताना दिसत आहे. युट्युबवर हे गाणं आतापर्यंत 7 कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. सध्या गाण्याचे व्ह्युज रोजच वाढताना दिसत आहेत.

त्रिदेव या सिनेमातील पिपरवा के तरवा हे गाणं आहे. अनेक हिट गाण्यांपैकी हे एक गाणं आहे. चाहत्यांकडून हे गाणं वारंवार पाहिलं जाताना दिसत आहे. हे गाणं पवन सिंहने स्वत: भोजपुरी गायिका प्रियंका सिंहसोबत गायलं आहे. 2017 साली रिलीज झालेला पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांचा हा सिनेमा भोजपुरी बॉक्स ऑफिसवर हिट झालेल्या सिनेमांच्या यादीत आहे. या सिनेमात पवन सिंह आणि अक्षरा सिंह यांच्याव्यतिरीक्त अरविंद अकेला कल्लू, अयाज खान आणि नेहाश्री सारखे अनेक भोजपुरी कलाकार आहेत.

सध्या पाहिले तर, भोजपुरी सिनेमाची ही हिट जोडी सध्या एकत्र दिसत नाही. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, खूप पूर्वी दोघांनी प्रचंड वाद झाला होता. हा वाद इतका वाढला होता की, पवन सिंहने अक्षरा सिंहवर हात उचलला होता असेही म्हटले जात आहे. यानंतर दोघांमध्ये खूपच अंतर निर्माण झाले होते. भोजपुरी सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय जोडी त्यानंतर एकत्र दिसली नाही. तरीही प्रेक्षकांना आशा आहे की, पुन्हा एकदा ही जोडी सिनेमात एकत्र रोमांस करताना दिसावी.

सिने जगत –

पुजा गुप्ताचे ‘ते’ फोटो सोशलवर व्हायरल

#Video : करिना कपूरचा ‘हा’ भन्‍नाट ‘फिटनेस’ व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

‘या’ ऍपच्या इव्हेंट मध्ये ‘कडक’ अंदाजात दिसून आली ‘ही’ अभिनेत्री..

#Video : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती

Loading...
You might also like