ना पवन सिंह, ना खेसारी लाल तरीही सुपरहिट झालं ‘हे’ भोजपुरी गाणं ! पहा रिेतेश पांडेचा धमाका (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  भोजपुरी इंडस्ट्रीत दीर्घकाळापासून सुपरस्टार पवन सिंह आणि खेसारी लाल यादव यांचं नाणं खणाणत आहे. हे दोन्ही चेहरे एवढे लोकप्रिय आहेत की, ज्य सिनेमात किंवा गाण्यात हे स्टार्स असतात ते गाणं किंवा सिनेमा आधीच हिट मानलं जातं. अशात या स्टार्सच्या यादीत आणखी नाव समाविष्ट झालं आहे ज्याच्या भोजपुरी गाण्याचे चाहते पागल आहेत. या भोजपुरी सुपरस्टारचं नाव रितेश पांडे आहे. आपल्या सिंगिंग आणि अ‍ॅक्टींगनं चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

रितेश पांडेचं एक गाणं सध्या युट्युबवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. पियवा से पहिले असं या गाण्याचं नाव आहे. सध्या हे गाणं झपाट्यानं व्हायरल होत आहे. युट्युबवर या गाण्याला 19 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अजूनही हे गाणं पाहिलं जात आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर खुद्द रितेश पांडे यानं हे गाणं गायलं आहे. अरुण बिहारी यानं हे गाणं लिहिलं आहे. या गाण्याचं म्युझिक डायरेक्शननं आशिष वर्मानं केलं आहे. पवन सिंह आणि खेसारी लाल नंतर आता रितेश पांडेदेखील भोजपुरी सिनेमात आपला जम बसवताना दिसत आहे. त्याचे सिनेमे आणि म्युझिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर हिट होताना दिसत आहेत.