Birthday Special : ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचा खेसारी लाल यादवसोबतचा ‘भोजपुरी’ डान्स व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हरियाणवी डान्सर, सिंगर आणि बिग बॉस स्पर्धक तसेच एक बॉलिवूड स्टार सपना चौधरी कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असतेच. धमाकेदार डान्स व्यतिरीक्त तिचा बिंधास्त अंदाजही चाहत्यांना आवडत असतो. आज सपनाचा 29 वा वाढदिवस आहे. आज सपनाचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. तसं तर चाहत्यांना तिचा प्रत्येक डान्स परफॉर्मंस आवडतच असतो. परंतु सध्या तिचा आणि भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाला यादवचा एक डान्स व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. खेसारी लाल आणि सपनाची छान केमिस्ट्री व्हिडीओत दिसत आहे.

https://youtu.be/Vpuwd3P3vqA

सपना चौधरीनं डान्स शो करत आपली ओळख तयार केली आहे. तिचे ठुमके पाहण्यासाठी शोमध्ये खूप गर्दी जमते. प्रेक्षक देखील तिच्यासोबत ठेका धरू लागतात. सपनाची फॅन फॉलोविंग एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. सध्या तिचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. यातील एक व्हिडीओ आहे तो म्हणजे सपना आणि खेसारी लाल यादव यांचा.

सपना आणि खेसारी लालचा हा व्हिडीओ एका लाईव शोदरम्यान रेकॉर्ड केलेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 54 लाख व्ह्युज मिळाले आहेत. सपना आणि खेसारी लालच्या फॅन फॉलोविंगमुळं या गाण्याला वारंवार हिट्स मिळताना दिसत आहेत. सध्या या डान्स व्हिडीओची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.