‘कमरिया हिला रही है’ गाण्यातून भोजपुरी सिंगर पवन सिंहचा हिंदीमध्ये ‘डेब्यू’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी म्युझिक इंडस्ट्रीतील फेमस सिंगर आणि अ‍ॅक्ट्रेस पवन सिंह यानं आता हिंदी म्युझिकमध्ये डेब्यू केला आहे. जॅकी भगनानीच्या म्युझिक लेबल जे जस्टम म्युझिकमधून पवननं आपला हिंदी साँग डेब्यू केला आहे. कमरिया हिला असं या गाण्याचं नाव आहे. होळीवर आधारीत हे गाणं असणार आहे. पवन सिंह आणि पायल देव यांनी या गाण्यासाठी आपला आवाज दिला आहे.

कसं आहे पवन सिंहचं गाणं ?

पवन सिंहच्या व्हिडीओत पवन सिंह डान्स करताना दिसत आहे. त्याच्यासोबत अ‍ॅक्ट्रेस आणि डान्सर लॉरेन गॉटलिब ही थिरकताना दिसत आहे. गाण्यात लॉरेनचा स्टीमी अंदाज दिसत आहे. दोघांच्या डान्स स्टेप्स चाहत्यांना आडवल्या आहेत. गाणं ऐकायला आणि पाहायलाही छान वाटत आहे.

कमरिया हिला या गाण्याचे बोल पायल देव आणि मोहसिन शेख यांनी मिळून लिहिले आहेत तर पायल देवनं हे गाणं कंपोज केलं आहे. पवन सिंहनं या गाण्याचं डायरेक्शन केलं आहे तर मुदस्सर खाननं कोरियोग्राफी केली आहे. सध्या हे गाणं चाहात्यांमध्ये चर्चेत असल्याचं दिसत आहे.

पवन सिंह भोजपुरी इंडस्ट्रीत आपल्या सिंगिंग आणि अ‍ॅक्टींगसाठी ओळखला जातो. त्यानं लालीपॉप लागे लु हे गाणं गाऊन खूप नाव कमावलं होतं. याशिवाय भोजपुरीमध्येच त्यानं देवाणी गाणी भजनही गायलं आहे.